" विरोधकांनी राजकारण करु नये".... मग सत्ताधारी काय करतात.?


 पंढरपूर ( प्रतिनिधी) सध्या देशांमधील विविध राज्यात बलात्काराच्या घटना त्या घडत असून लैंगिक अत्याचार बलात्कार अशा अमानवीय या घडत असताना विरोधक हे  राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. अशी परिस्थिती देशांमधील पश्चिम बंगाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सद्यस्थितीला दिसून येत आहे.

    महाराष्ट्रामधील मुंबई जवळील असलेले बदलापूर येथील एका शाळेमध्ये तीन वर्षाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते मंडळींनी सत्ताधारी विरोधात आवाज उठवला व या घटनेचा निषेध संपूर्ण राज्यभर होत असल्याचा आपण पाहत आहोत. परंतु या घटनेची सखोल चौकशी व पीडीत मुलीला न्याय व दोषी व्यक्तीला कडक शिक्षा व्हावी. त्याचप्रमाणे शाळेमधील कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून व त्या शाळेतील व्यवस्थापनाला जबाबदार धरून कारवाई करायला हवी. अशी मागणी विरोधक करताना दिसत आहे. परंतु सत्ताधारी मंडळी या विरोधकाच्या मागणीला व त्यांच्या मोर्चा व निषेध या प्रकाराला ते राजकारण म्हणू लागलेले आहेत. विरोधक राजकारण कुठल्याही गोष्टीवर करीत आहेत. असा आरोप महाराष्ट्रातील सत्ताधारी मंडळी करताना आज रोजी दिसत आहे. 

    महाराष्ट्रातील गृह खात्याचे अशा घटनेकडे दुर्लक्ष होते की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. देशामध्ये केंद्र शासना मध्ये गृह खाते हे भाजपाकडे आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गृह खाते देखील भाजपाकडे आहे. अशा घटना या देशभरात होत असताना त्या पीडीत महिलेला, बालिकेला न्याय मिळाला हवा त्याचप्रमाणे गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हायला हवी. अशी  अपेक्षा सर्वसामान्य जनता करताना दिसत आहे. 

    अशीच बलात्काराची घटना कलकत्ता येथील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलीवर गॅंग रेप सारखा प्रकार घडल्यामुळे तेथील विरोधक भाजपा व अन्य पक्षीय मंडळी तेथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना दिसत आहे. व तेथील सरकारला धारेवर धरत आहे. तेथे भाजपची सत्ता नसून तृणमल काँग्रेसची ही सत्ता आहे. अशा ठिकाणी भाजपा तृणुमल काँग्रेसवर टीका करताना दिसत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाचे मित्रपक्षीयसरकार असून या ठिकाणी भाजपा व अन्यपक्षीय नेते या बलात्काराच्या घटनेचे राजकारण करू नका म्हणतात. मग पश्चिम बंगालमधील घटनेवर भाजपा विरुद्ध दर्शवत आहे. निषेध व्यक्त करत आहे. तेथील सत्ताधाऱ्यांनी असेच म्हणावे का?  या घटनेचे राजकारण करू नये असे भाजपा सरकार व भाजपाचे नेते मंडळी म्हणत असताना भाजपा व मित्रपक्ष यांनी अशी दुटप्पी भूमिका घ्यावी का ? अशा भूमिकेमुळे भाजपा व त्यांचे मित्र पक्ष हे जनतेपुढे उघडे पडत असल्याचे दिसून येत आहे. 

   राज्यामध्ये व देशांमध्ये कोणत्याही पक्षाचे सत्ता असू द्या परंतु अशा अमानवीय घटना, लैंगिक अत्याचार, बलात्कार अशा घटना घडल्या तर त्याचा कडक निषेध व गुन्हेगारावर वचक, गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी. अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....