"लोकजागृती चे कार्यक्रम आयोजित करून आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा "
पंढरपूर ( प्रतिनिधी) माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारायण चिंचोली या गावी राष्ट्रपती पदक विजेता कीर्तनकार, भारुडकार चंदाताई तिवाडी यांचा लोकजागृतीचा ,जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करून प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मण तात्या धनवडे यांनी केले. यावेळी त्यांच्यासह उपस्थित नारायण चिंचोली चे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत समिती सदस्य व नारायण चिंचोली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी वाढदिवस संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये उत्साहाने साजरा केला जात आहे. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकठिकाणी विविध उपक्रम आयोजित करून हा वाढदिवस साजरा केला जात आहे. नारायण चिंचोली या गावी या गावातील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजना या कोणत्या व कशा आहेत? त्या कशा लाभदायक आहे. याची माहिती लोक जागृतीचे कीर्तनकार चंदाताई तिवारी यांनी आपल्या कार्यक्रमामधून या सर्व शासकीय योजनांची माहिती व त्याचे फायदे त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.
नारायण चिंचोली येथील परिचारक प्रेमी लक्ष्मण तात्या धनवडे हे शासकीय योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते करतात. व या शासनाचा विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा व लोकांमध्ये लोक जागृती व्हावी. म्हणून प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारायण चिंचोली या गावी कीर्तनकार चंदाताई तिवाडी यांच्या लोकजागर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ कसा आहे. त्याची माहिती व कोणकोणते सुविधा शासन सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देत आहे. याची माहिती त्यांनी आपल्या कीर्तन व भारुडातून चंदाताई तिवाडी यांनी सांगितले. असे लोक जागृती चे कार्यक्रम व शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्याचे कार्य हे लक्ष्मण तात्या धनवडे करीत असतात. त्याला उत्स्फूर्तपणे लोकांनी प्रतिसाद दिल्याचे आज रोजी दिसून येत होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा