"है तयार हम" विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत सौ साधना ताई भोसले.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या कडून आपण विधानसभा उमेदवार म्हणून इच्छुक असल्याचे सौ साधनाताई भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन आपण येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघामधून इच्छुक असल्याचे आपल्या निवेदनाद्वारे त्यांनी आपली उमेदवारीची मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली.
पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सलग सात-साडेसात वर्ष आपली नगराध्यक्ष पदाची कारकीर्द लोकप्रिय करीत पंढरपूर शहराच्या विकास कामांमध्ये सिंहाचा वाटा निर्माण करणारे महिला व्यक्तिमत्व म्हणून आज सौ. साधनाताई भोसले या ओळखल्या जात आहेत.
सौ. साधनाताई भोसले या उच्चशिक्षित असून त्यांचे हिंदी इंग्रजी आणि मराठी भाषेवर वर्चस्व असून त्यांनी आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दी मधून सिद्ध केले आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न धडाडीने व त्वरित सोडवण्याची त्यांची भूमिका तसेच गोरगरीब कष्टकरी यांची न्याय बाजू घेऊन त्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा त्या प्रयत्न करीत असतात. त्यांच्या मदतीला त्यांचे पती उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांची साथ सोबत असल्यामुळे आणि नागेश काका भोसले यांचा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये असलेला जनसंपर्क या संपर्काच्या माध्यमातून सौ. साधनाताई भोसले या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये विधानसभेसाठी सहज निवडून येऊ शकतात. याची खात्री त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील पुरुष मतदारांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वसामान्य महिलांचे दुःख व त्यांचे अडचणी समस्या हे त्या जाणतात. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी व महिलांना न्याय देण्याच्या भूमिकेमुळे त्या महिला वर्गामध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी तसेच ऊस उत्पादक शेतकरी बेरोजगार तरुण, उद्योजक महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या विकास कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची त्यांची आजपर्यंतची भूमिका पहाता त्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनतेला न्याय देऊ शकतील. अशी चर्चा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मध्ये सध्या सुरू आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघासाठी स्त्री उमेदवार म्हणून आज पर्यंत दुर्लक्ष केले गेले असल्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून एक सक्षम स्त्री उमेदवार म्हणून त्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या वतीने त्या निवडणूक लढू इच्छितात. निवडणूक लढवण्यासाठी ची इच्छा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदन देते प्रसंगी उपस्थित सुधीर आबा भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी व्यवस्थापक सुनील मोहिते व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा