"एक गाव एक गणपती ही योजना राबवावी" डॉल्बी सिस्टीम चा वापर टाळावा.... उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले साहेब
पंढरपूर ( प्रतिनिधी) येत्या गणेशोत्सवामध्ये एक गाव एक गणपती ही शासनाने सुचवलेली योजना पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमधून राबविण्यात यावी असे आवाहन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले साहेब यांनी आज पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे निमंत्रित केलेल्या पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमधील गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाचे या दरम्यान मध्ये घ्यावीची काळजी याची माहिती त्यांनी दिली..
यावेळी उपस्थित पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर तसेच अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलत असताना पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले साहेब यांनी पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमधील गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांना एक गाव एक गणपती योजना शासनाने सुचवलेली आहे ती राबवावी तसेच डॉल्बी सिस्टीम ही वाजवली जाऊ नये मिरवणूक किंवा अन्य कार्यक्रमाच्या दरम्यान मध्ये ही कर्कश आवाजातील डॉल्बी सिस्टीम लावण्यात येऊ नये असे सांगून या डॉल्बी सिस्टीम मुळे वयोवृद्ध आजारी पेशंट लोकांना त्रास होतो याची माहिती देखील त्यांनी दिली तरी प्रत्येक गावातील लोकांनी गणेशोत्सवामध्ये मिरवणुकीच्या दरम्यान पारंपारिक वाद्य ही वाजवली जावी व कुठलीही अनुचित प्रकार घडता कामा नये असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गतवर्षी ज्या ज्या मंडळांनी गणेशोत्सव काळामध्ये शिस्तबद्ध मिरवणूक काढल्या होत्या त्या 11 गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना च्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले विविध गावचे गणेशोत्सव तरुण मंडळ पुढील प्रमाणे शिवरत्न गणेश मंडळ लक्ष्मी टाकळी, क्रांतिसिंह नाना पाटील गणेशोत्सव मंडळ सिद्धेवाडी, गणेश तरुण मंडळ कोढरकी, सन्मित्र तरुण मंडळ शेगाव दुमाला, अंबिका मध्यवर्ती गणेश मंडळ सुस्ते, विघ्नहर्ता गणेश मंडळ भटुंबरे, गणेश तरुण मंडळ सिद्धेश्वर वस्ती, बाल गणेश मंडळ अजंनसोंड, जय अंबे गणेश तरुण मंडळ सुस्ते श्रीमंत तरुण मंडळ लक्ष्मी टाकळी, बाल गणेश बहुउद्देशीय संस्था तारापूर,
इत्यादी गावातील गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा