"केंद्रीय मानवाधिकार संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मुजमिल कमली वाले व पंढरपूर तालुका अध्यक्षपदी अपराजित सर्वगोड यांची नियुक्ती"
पंढरपूर ( प्रतिनिधी) केंद्रीय मानव अधिकारी संघटना दिल्ली यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय मानव अधिकार संघटनेची विविध जिल्ह्यांमध्ये व तालुक्यामधून या संघटनेचे कार्य वाढवण्याचे उद्देशाने व सर्वसामान्य दीन दलित पीडित व संकटात सापडलेल्या लोकांना योग्य तो न्याय देण्याच्या उद्देशाने आणि गोरगरिबावर होणारे अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण, आदी मानवी हक्काचे उल्लंघन करणारे असंख्य गोष्टी या सर्व बाबींच्या वर सर्वसामान्य जनतेला व पिढीत लोकांना न्याय मिळवून देण्याचा उद्देशाने केंद्रीय मानव अधिकार संघटना ही कार्य करते. मानवीय हिताच्या रक्षणासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटना ही स्थापन झालेली असून याचे कार्य व याची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी व पिढीत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही केंद्रीय मानव अधिकारी संघटना कार्य करत राहणार आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी पंढरपूर शहरातील समाजसेवक मुजमिल कमली वाले यांची निवड करण्यात आलेली असून त्याचप्रमाणे पंढरपूर शहर व तालुका अध्यक्षपदी पत्रकार अपराजित सर्व गोड त्यांची निवड करण्यात आलेली आहे. असे केंद्रीय मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे यांनी आज निवडीच्या प्रसंगी सांगितले.
नूतन पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कार्य करावे.
या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर तसेच अन्य तालुक्यातील केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा