एक कोटी देवतांचे गाव "कोर्टी" "शंभू महादेवाचे" जागृत देवस्थान


 पंढरपूर ( प्रतिनिधी) देवांचे देव शंभू महादेव यांचे जागृत देवस्थान पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावी असून शिव शंभू महादेवाचे हे मंदिर हेमाडपंथी बांधकामाचे असून या संपूर्ण परिसरामध्ये शंभू महादेव हे जागृत देवस्थान असल्याचे सुप्रसिद्ध आहे. 

      शंभो महादेवाचे हे मंदिर पूर्णपणे अखंड दगडाचे असून या मंदिरामध्ये दगडाचे 18 खांब असून व सहा स्वयंभू पिंडी व शिवपार्वतीची मूर्ती आहे. हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी असून या शंभू महादेवाच्या मंदिराचा उल्लेख पोथी पुराणांमध्ये केला गेलेला आहे. "आधी कोर्टी मग सृष्टी"  असेही कोर्टी गावाला म्हटले जाते. 

     कोर्टी या गावाच्या परिसरामध्ये कोठेही बांधकामासाठी खोदकाम केले असता महादेवाच्या पिंडी या सापडतात. या कोर्टी गावामध्ये कोट्यावधी पेक्षाही जास्त देव असल्यामुळे या गावाला कोर्टी या नावाने ओळखले जाऊ लागले. श्रावण महिन्यामध्ये भाविक दर्शनाकरिता येत असतात. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवशंभू महादेवाला अभिषेक व तांदळाचे पिंड लिपतात येथील गुरव तांदूळ शिजवून या भाताने लिपतात. भाविक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नारळ अर्पण करतात व पाच नारळाचे तोरणही बांधले जातात.  शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये पहाटे पाच वाजता पूजाअर्चा केली जाते. येथील पूजा करण्याचा मान श्याम गुरव व अनिल गुरव यांच्याकडे आहे. श्रावण महिन्यात सुरुवातीला मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधून व पंढरपूर तालुक्यामधील लाखोच्या संख्येने भावीक शंभू महादेवाच्या दर्शनास करिता येत असतात. नवसाला पावणारा शंभू महादेव म्हणून प्रसिद्ध असलेले हे शंभू महादेवाचे जागृत देवस्थान आहे. अशी माहिती कोर्टी ग्रामस्थांनी व शंभू महादेवाच्या पुजारी यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....