"लाखो वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ "


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . श्री विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी भाविक भक्त हे देहू आळंदीहून संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या दिंडीच्या सोबत लाखोच्या संख्येने वारकरी भाविक भक्त हे पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत असतात. अशा या पायी चालत येणाऱ्या वारकरी भावीक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मंत्रालयाच्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही आरोग्य विषयक योजना गेल्या दोन-तीन वर्षापासून आषाढी यात्रेच्या दरम्यान भाविक भक्तांसाठी सुरू केलेली आहे. 

    देहू आळंदी पासून येणाऱ्या भावीक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या साठी औषध उपचार त्याचप्रमाणे त्यांना चालत येताना होणारे आजार या सर्व आजारांवर औषध उपचार व ॲम्बुलन्स तसेच बेडची व्यवस्था ही केली जाते. वारकरी भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग हे आरोग्य यंत्रणा राबवित आहेत. 

    वारकरी भक्त देहू आळंदी पासून ते पंढरपूर तीर्थक्षेत्री येई तोपर्यंत आणि पंढरपूर या ठिकाणी मुक्कामी असल्याचा दिवसापासून पंढरपूर परिसरामध्ये असलेली वाखरी गोपाळपूर त्याचप्रमाणे 65 एकर परिसर आणि तीन रस्ता या चार ठिकाणी भावी भक्तांच्या वर औषध उपचार हे केले गेले. एकूण 13 लाख 96 हजार 72 एवढ्या मोठ्या संख्येने वारकरी भाविक भक्तांनी औषध उपचाराचा लाभ घेतला. 

     महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व असंख्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही आरोग्य वारी यशस्वी केली गेली. वारकरी भाविक भक्तांच्या मधून या आरोग्य ची वारी पंढरीच्या दारी या योजनेवर समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने वारकरी भक्तांची आरोग्याची जपणूक करण्यासाठी ही शासनाने सुरू केलेली आरोग्य विषयक योजना खूपच चांगली आहे. असे असंख्य वारकरी भक्तांच्या मनोगतातून व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....