"मराठा व धनगर आरक्षणावर केंद्र शासन व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा". खासदार प्रणिती शिंदे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज व मराठा समाज या दोन्ही समाजाच्या कडून आरक्षणाची मागणी ही गेली कित्येक वर्षापासून सातत्याने होत आहे. धनगर समाज हा अनुसूचित जमाती मधून आरक्षण मागतोय तर मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण मागतोय. महिलांच्यासाठीचा असलेला 30% चा आरक्षण बाबत देखील शासन निर्णय घेत नाही. मराठा व धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा हा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे. या दोन्ही समाजाच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होते की काय?  अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे . केंद्र सरकार व राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. अशी मागणी सोलापूर जिल्ह्याच्या महिला खासदार प्रणिता ताई शिंदे यांनी आज लोकसभेमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील या मराठा व धनगर समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला.

     आय काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी देखील संपूर्ण देशभरामधील विविध जातीची जात गणना ही लवकरात लवकर व्हायला हवी अशी मागणी केलेली आहे. जात गणना झाल्यानंतर आरक्षण बाबत टक्केवारी ही ठरवता येईल. असे राहुल गांधी यांचे म्हणणे असल्याचे देखील खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी आज   सांगितले. 

     खासदार प्रणिती ताई शिंदे या खासदार झाल्यानंतर त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दी मधील पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी महाराष्ट्र मध्ये असलेला हा मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मांडला. आणि या दोन्ही समाजाला केंद्र सरकारने व राज्य सरकारने न्याय मिळवून द्यावा.  आरक्षणा बाबतीत महाराष्ट्रातील मराठा समाज व धनगर समाज हा आशेने खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्याकडे पाहू लागला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....