" अतिक्रमण हटाव मोहीम अखंडितपणे कार्यरत रहावी "भाविक भक्तांची मागणी.
पंढरपूर ( प्रतिनिधी) लाखोच्या संख्येने आषाढी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांना वाहतुकीचा त्रास होऊ नये म्हणून पंढरपूर नगरपरिषद सद्या पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे.शहरातील सर्व महत्त्वाच्या रस्त्याच्या कडेला लोकांनी अतिक्रमण करुन रस्ते व फुटपाथ अडवले आहे.नगरपालिकेच्या गाळेधारकांनी आपल्या दुकानासमोर पानसर लावून आपले दुकान वाढवले आहे.अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,प्रदक्षना मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विवेक वर्धिनी हायस्कूल , सावरकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, गजानन महाराज मठामाघील भाग तसेच नदीकाठच्या भागात अतिक्रमण कायमस्वरूपी दिसून येते.
नगरपालिकेच्या कित्येक मौल्यवान जागा या झोपडपट्टी ने भरलेल्या आहेत.यासर्व बाबतीत नगरपालिकेने व नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज ही पंढरी नगरीमध्ये बकालपणा दिसून येत आहे.
पंढरपूर हे पर्यटन क्षेत्र व तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.कोट्यावधी रुपयाचा निधी कायमस्वरूपी उपलब्ध होत आहे.तरी देखील पंढरपूर शहरातील घाणीचे साम्राज्य व अतिक्रमण करुन अतिक्रमत साम्राज्य सर्वत्र दिसून येते.विविध पक्षाच्या लोकसेवकांनी व भावी लोकसेवकांनी आपले कार्यालय की गप्पा टप्पालय थाटलेले दिसून येते.या सर्व बाबी़च्या कडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष असते हे कायमचे दिसून येते.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.परंतू या शहरात आले नंतर भाविकांचा भ्रमनिरास होतो . पंढरपूर येथे कायम स्वरुपी भाविकांची गर्दी दिसून येते.या भाविकांची आवकजावक वाढली तरच पंढरपूर वासीयांचे आर्थिक स्थिती चांगली होणार आहे.
पंढरपूर नगरपालिकेने व शहरातील रहिवाशींने या अतिक्रमण हटाव मोहीम अखंडितपणे कार्यरत रहावी म्हणून प्रयत्न करावे अशी माफक अपेक्षा भाविक भक्त हे करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा