"दहा कोटीचा निधी मराठा भावनासाठी देणार आहोत"... मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे
पंढरपूर ( प्रतिनिधी) कार्तिकी यात्रेसाठी महा पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असता त्यांनी मराठा बांधवांना मराठा भवनासाठी आवश्यक असलेली जागा व इमारत उभी करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणे चे आश्र्वासित केले होते.
त्याप्रमाणे व आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत केलेली मागणी नुसार व मराठा बांधवांच्या प्रचंड रेट्यामुळे मराठा भवनासाठी जागा व निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरातील मध्यवर्ती परिसरामधील गजानन महाराज मठामाघील जागेवर साईट क्रमांक 45 या जागेवर छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने मराठा भवन उभे राहत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन आमदार समाधान आवताडे, नागेश काका भोसले, किरण आप्पा भोसले, सुधीर आबा भोसले,मा.नगराध्यक्षा सौ.साधना भोसले यांच्या उपस्थितीत या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास उपस्थित म्हणून आमदार समाधान दादा अवताडे, महेश नाना साठे, नागेश काका भोसले,किरण आप्पा भोसले,व अन्य राजकीय नेतेमंडळीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
मराठा भवन ची खूप दिवसांची मराठा बांधवांची मागणी ही पूर्ण होत आहे.या जागेवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ग्रंथालय,होस्टल, तसेच व्यापारी संकुल उभे रहाणार आहे.भव्यदिव्य अशी इमारत उभी रहाणार आहे.अशी माहिती सकल मराठा समाजातील नेतेमंडळींनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आपल्या भाषणात पुढे म्हणाले छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने मराठा भवन येथे उभे रहात आहे.या भवनासाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.अजून दहा कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वास्तू चा मराठा समाजातील लोकांना होणार आहे..
राज्यातील सर्व कष्टकरी कामगार तसेच शेतकऱ्यांना विकासाच्या माध्यमातून त्यांचे कल्याण करणार आहे. महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही अमलात आणलेली आहे. त्याचा लाभ लाखोच्या संख्येने महिला भगिनींना होणार आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देणार आहोत. असे त्यांनी आज रोजी मराठा भवन या भावनांच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा