" आरोग्याची वारीची जय्यत तयारी सुरू"
पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाकडून डॉ. तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री यांच्या मार्गदर्शना नुसार पंढरपूर या तीर्थक्षेत्री भरणाऱ्या सर्वात मोठ्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी ही आरोग्य विषयक संकल्पना डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेल्या काही वर्षापासून समस्त वारकरी बांधवांच्या आरोग्याची जपणूक करण्याच्या उद्देशाने, वारकरी भाविक भक्तांचे आरोग्य चांगले राहावे. त्यांना यात्रा कालावधीमध्ये जाणवणाऱ्या व होणाऱ्या आजारासाठी औषध उपचार हा मोफत केला जाणार आहे. या सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालय च्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी ही योजना राबवली जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी ते पंढरपूर या तीर्थक्षेत्र या मार्गावरील सर्व वारकरी दिंडी मधून असलेले वारकरी भाविक भक्तांची आरोग्याची सेवा करण्याचा उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने हे आरोग्यदायी योजना अमलात आणली जात आहे. या योजनेचा लाभ लाखो भाविकांना प्रत्येक वर्षी होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मधून आरोग्य सेवा ही भावी भक्तांना मिळणार आहे. भावी भक्तांच्या सेवेसाठी हजारोच्या संख्येने आशा कार्यकर्ता व डॉक्टर तसेच औषध उपचार देणारी सेवक हे कार्यरत असणार असून हजारोच्या संख्येने विविध ठिकाणी बेडची सुविधा करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ पाणी वारकरी भक्तांना पिण्याच्या साठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वारकरी भावीक भक्तांच्या आरोग्याच्या उद्देशाने सर्व आरोग्यविषयक सुविधा ॲम्बुलन्स त्याचप्रमाणे औषधे ऑपरेशन थेटर्स या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती मिळालेली आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली त्याचप्रमाणे संत तुकाराम यांच्या पालखीसोबत येणाऱ्या असंख्य दिंड्या व भावीक भक्त हे वारकरी वाखरी या ठिकाणी जमा होतात. त्या ठिकाणी देखील वारकरी भक्तांच्या सेवेसाठी त्यांचे आरोग्याची काळजी घेण्याचा उद्देशाने आरोग्य शिबीर उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी देखील सर्व औषध उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर चंद्रभागा नदीकाठच्या परिसरामध्ये 65 एकर या भागामध्ये तीन रस्ता या भागांमध्ये देखील महाआरोग्य शिबिराचे भले मोठे केंद्र उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी देखील औषध उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गोपाळपूर या ठिकाणी देखील आरोग्य मंत्रालयाच्या वतीने महा आरोग्य सेवेची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती संबंधित आरोग्य विभागाकडून कळते.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांच्या आरोग्याची जपणूक करण्याचा उद्देशाने व वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून सर्व सेवा सुविधा औषध उपचार हे उपलब्ध करून देण्याचे त्यांनी ठरवलेले आहे. याचा लाभ गेल्या काही वर्षापासून पंढरीच्या वारीला येणाऱ्या भाविक भक्ताने या आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला आहे. ही आरोग्य विषयक सुविधा भावी भक्तांसाठी उपलब्ध असल्यामुळे भावीक भक्ता मधून समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा