"तलाठी कार्यालयात तुफान गर्दी" उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी महिलांची तौबा गर्दी.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतीच महाराष्ट्र शासनाने महिलांच्यासाठी कल्याणकारी "लाडकी बहीण" ही योजना या योजनेची घोषणा केलेली असून या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील वय वर्ष 21 ते 60 वयापर्यंत च्या महिलांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या बँक खात्यामध्ये बाराशे ते पंधराशे रुपये दर महा जमा करण्याचे नियोजन केलेले आहे.  महाराष्ट्रातील महिला या स्वावलंबी व्हायला हवी व स्वबळावर त्यांनी उभे राहावे. या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व महिलांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केलेली असून याचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना होणार आहे. 

    नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश सरकारने या निवडणुकीपूर्वी लाडली बहन या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी ही योजना राबवली. या योजनेला प्रतिसाद म्हणून मध्य प्रदेश मधील भाजपा सरकारला महिलांनी भरपूर मतदान केले. ही मध्य प्रदेशची योजना महिलांना भाजपाकडे आकर्षित केली जाऊ शकते. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली असून या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना होणार आहे. 

     या योजनेअंतर्गत लागणारी कागदपत्रे ही गोळा करण्यासाठी पंढरपूर तसेच महाराष्ट्रभरातील अन्य शहरांमधून उत्पन्नाचे दाखले व अन्य कागदपत्रे गोळा करण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. 

    पंढरपूर येथील तलाठी कार्यालयाच्या बाहेर असंख्य महिलांनी उत्पन्नाचा दाखला मिळावा म्हणून गर्दी केल्याचे आज दिसून आले. ही गर्दी पाहता महाराष्ट्र शासनाने महिलांच्यासाठी उत्पन्नाचे दाखले व अन्य कागदपत्रे मिळण्याच्या उद्देशाने अन्य ठिकाणी देखील असे उत्पन्नाचे दाखले मिळण्याचे योजना व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी देखील या ठिकाणी जमलेल्या महिलेने केलेली आहे. शासनाच्या या योजनेला महिला या प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. त्यासाठी शासनाने देखील महिलांना या योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे लवकर मिळावेत यासाठी अन्य ठिकाणी देखील या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व त्यांना त्वरित दाखले मिळावेत. अशी अपेक्षा देखील या महिलावर्गांनी व्यक्त केलेली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....