यंदा देखील "आरोग्याची वारी पंढरीच्या दारी". आरोग्य मंत्रालयाचा उपक्रम.
पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक ,आंध्र प्रदेश व अन्य राज्यातून आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळा बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय हा दिंड्यांच्या सोबत येत असतो.
आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या वतीने यंदाच्या वर्षी देखील आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी ही योजना अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केले जात आहे. प्रस्थानाच्या पासून आरोग्य यंत्रणा ही कार्यरत राहणार आहे .
या आरोग्य शिबिरात अद्यावत आरोग्य यंत्रणे सह तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येणार असून 5000 च्या संख्येने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे कार्यरत असणार आहे. भाविकांचे आरोग्य तपासणी करून तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभागाकडून मोफत औषध पुरवठा, पिण्याचे पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येणार आहे. तसेच पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या पालखी दिंड्यांच्या प्रत्येक मार्गावर आरोग्य विभागाचे सर्व दवाखाने तसेच खाजगी दवाखाने 24 तास सुरू राहतील. याची दक्षता घेण्यात यावी. अशी सूचना महाराष्ट्र आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केल्या.
या बैठकीस महारोग्य शिबिर आयोजन बाबत आयोजित बैठकीमध्ये उपस्थित जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, राज्य आरोग्य उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.संतोष नवले.,प्रांताधिकारी सचीन इथापे या सह राज्यातील आँनलाईन जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्यचिकित्सक उपस्थित होते.
मागील आषाढी यात्रेला अकरा लाख भाविकांनी या आरोग्य योजनेचा लाभ व आरोग्य सुविधा देण्यात आली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा