"विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांचे भवितव्य उज्वल"..... आमदार समाधान दादा अवताडे.
पंढरपूर ( प्रतिनिधी) विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आपण ज्या समाजामध्ये राहतो. त्या समाजाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने त्यांनी शिवसेना शिंदे गट या पक्षाचे पंढरपूर शहर अध्यक्ष या नात्याने त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले आहे..त्यांनी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विविध थोर महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी पंढरपूर शहरातील युवकांना या महापुरुषाचे कार्य, कर्तृत्व हे मनामध्ये ठसवण्याच्या उद्देशाने त्यांनी शिवजयंती , राजमाताअहिल्यादेवी होळकर जयंती महात्मा फुले जयंती ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती , छत्रपती संभाजी महाराज जयंती यानिमित्ताने त्यांनी युवकांच्या मनावर महापुरुषाचे आदर्श विचार रुजवण्याच्या उद्देशाने त्यांनी हे सामाजिक कार्य, त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदनांचे विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्याला झोकून दिलेले आहे. त्यामुळे विश्वजीत ( मुन्ना) भोसले यांचे भवितव्य उज्वल आहे.
असे मनोगत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज रोजी कर्नल भोसले चौक येथे आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन व गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत असताना आपले मनोगत व्यक्त केले.
आज सहा जून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने कर्नल भोसले चौक येथे रक्तदान शिबिर व गुणवंतांचा सत्कार हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या रक्तदान शिबिरामध्ये असंख्य युवकांनी आपले मौल्यवान रक्तदान केले. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या दहावी ,बारावी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थित अनिल दादा सावंत, माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले, किरण आप्पा भोसले, डॉ. पाच कवडे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा