"महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन पंढरपुर येथे मंजूर झाले". मराठा बांधव व आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नास यश
पंढरपूर ( प्रतिनिधी). पंढरपूर येथील मराठा समाज बांधवांनी ज्याप्रमाणे मराठा आरक्षण हा मुद्दा जसा शासन दरबारी लावून धरला. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी शासनाने अर्थसहाय्य पुरवावे आणि पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्र असलेल्या शहरांमध्ये मराठा समाज बांधवांसाठी मराठा भवन ही आवश्यक असल्याचेही शासन दरबारी विविध आंदोलन व न्यायिक पद्धतीने शासन दरबारी विनंत्या करून पंढरपूर शहरातील येथे महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन या मराठा भवनास शासनाने निधी व जागा उपलब्ध करून दिली.
मराठा भवन पंढरपूर शहरांमध्ये व्हावे म्हणून पंढरपूर शहर व तालुका येथील मराठा बांधवांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला आज यश आलेचे दिसून आले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी देखील पंढरपूर येथे मराठा भवन होण्यासाठी व या मराठा भवनासाठी आवश्यक असलेली जागा व निधी शासनाकडून उपलब्ध व्हावी म्हणून केलेल्या प्रयत्नास त्यांना यश आल्याचे आज दिसून आले.
मराठा भवन उभा राहणार व त्यास निधी व जागा मिळाल्याच्या आनंदात पंढरपूर शहरातील व तालुक्यातील मराठा बांधवांनी आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लोकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
यावेळी मराठा समाजातील नेते व कार्यकर्ते हे उपस्थित होते. मराठा समाजाचे अर्जुनराव चव्हाण, दत्ता काळे, शंकर सुरवसे, संतोष डोंगरे व असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा