"मी पुन्हा येईन " म्हणणारे नेते आता म्हणू लागले"आता नक्की जाईन "


 पंढरपूर ( प्रतिनिधी) लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती मधील काही मान्यवर नेते हे आपल्या वक्तव्यामुळे, त्याचप्रमाणे अति आत्मविश्वासामुळे आणि विकास कामाबाबत न बोलता फक्त विरोधकावर टीका करणे. हा एक कलमी कार्यक्रम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मान्यवरांनी केल्याचे दिसून आले. 

    मी पुन्हा येईन असे म्हणून गत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री हे अति आत्मविश्वासाने त्यांनी गत विधानसभेचे निवडणूक लढवली परंतु या निवडणुकीमध्ये 105 आमदार निवडून आणून देखील त्यांच्या या मी पुन्हा येईन या वक्तव्यामुळे ,त्याचप्रमाणे मुख्यमंत्री कोण होणार? ते स्वतः की उध्दव ठाकरे या वादंगावरुन शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षाचा झालेला काडीमोड आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आहे या मित्र पक्षाच्या सोबत शिवसेनेने केलेली गटबंधन या माध्यमातून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मी पुन्हा येईन हे वाक्य फडणवीस यांचे हवेतच विरून गेले ते आपण सर्वांनी पाहिले आहे.

     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीमध्ये कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण देशभरामध्ये थैमान घातले होते. या कोरोना सारख्या महामारीला तेवढ्याच ताकतीने उद्धव ठाकरे आणि त्यांचे सरकार यांनी कोरोनावर मात केल्याची देखील आपण जनतेने पाहिले. परंतु उद्धव ठाकरे यांच्या कार्या कडे न पाहता त्यांच्या वर घरातून सरकार चालवतात अशी टीका केली गेली. 105 आमदार असून देखील सत्तेपासून दूर राहिल्याचे दुःख भाजपा नेते मंडळींना जास्त टोचू लागलेले होते. त्यामधूनच भाजपाच्या नेतेमंडळींनी शिवसेना फोडण्याचे प्रथम कार्य केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून स्वतः उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानत देवेंद्र फडणवीस  सत्तेत सामील झाले. सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर देखील पुरेसं बहुमत असताना देखील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते अजित पवार यांना व त्यांच्या काही आमदारांना पडण्याचे काम या भाजपा व एकनाथ शिंदे सरकारने केले. या फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य जनता ही जवळून पाहत होते. सत्तेसाठी वेगवेगळे पक्ष फोडण्याचे काम भाजपा करीत असल्याचे समजूत सर्वसामान्य मतदारांची झाल्यामुळेच आज भाजपा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नाममात्र जागेवर या महायुती चे उमेदवार निवडून आल्याचे दिसत आहेत. 

    महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा हा निर्यात बंदी करून या शेतकऱ्याच्या कांद्याला योग्य तो भाव मिळू दिला नाही. आणि त्याचप्रमाणे गुजरात राज्यातील कांदा शेतकऱ्यांना निर्यातीची परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाल्याचे दिसून आले. याचा राग देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात मतदान करीत आपला आपला विरोध या महायुतीला दर्शवलेला आहे. 

     त्याचप्रमाणे मराठा आरक्षण सारखा संवेदनशील असलेला विषय फडणवीस व त्यांच्या सरकारातील मंत्र्यांनी खूपच ताणून धरल्यामुळे व मराठा बांधवांवर अंतरावली सराटी येथे झालेला लाटी हल्ला, त्यामध्ये जखमी झालेले महिला, वयोवृद्ध नागरिक व असंख्य लोक जखमी झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले. मराठा समाजाला सातत्याने डिवण्याचा  व त्यांना आश्वासन देऊन फसवण्याचा कार्यक्रम या महायुतीच्या सरकारने केल्यामुळे या मराठा समाजाची देखील नाराजी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली. मराठा समाजातील युवकांनी व लोकांनी मराठवाडा मधील तसेच अन्य महाराष्ट्रातील भागांमधून भाजपा व महायुतीच्या विरोधात मतदान केल्यामुळे कित्येक जागा या पराभूत झाल्याचे आज स्पष्ट होत आहेत.

    भाजपाच्या नेते मंडळींनी  लोकसभेचे उमेदवार देतेवेळी सर्वसामान्य जनतेच्या मनातील उमेदवार या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे , तसेच काही ठिकाणी उपरे उमेदवार देण्यात आल्यामुळे काही ठिकाणी निष्क्रिय उमेदवार देण्यात आले. आणि प्रचारांमध्ये या भाजपाचा मान्यवर नेत्यांनी भाजपाच्या कमळ या चिन्हावर लढणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी दिली तर ते निवडून येऊ शकतात. असा असलेला त्यांचा अति आत्मविश्वास हा भाजपा ला नडल्याचे आजच्या घडीला दिसून येत आहे.

     लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती 40 ते 45 जागेवर निवडून येणार. असे ठामपणे सांगत फिरणारे हे महायुतीचे नेते आज घडीला नाम मात्र उमेदवार निवडून आल्यामुळे हे नेते मंडळी नैराश्याच्या गर्तेत गेल्याचे दिसून येत आहे. आणि या नैराश्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वरिष्ठ कार्यकारिणीकडे मला मंत्री पदाच्या कार्यातून मुक्त करा अशी  विनंती भाजपाच्या वरिष्ठ कार्यकारिणीला केल्याची समजत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाची झालेली पीछे हाट याची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रीपदाच्या पदावरून कार्यमुक्त होऊ इच्छित आहेत. मी पुन्हा येईन म्हणणारे असे हे नेते आता म्हणू लागलेले आहेत. आता मात्र नक्कीच जाईन. या सर्व घडामोडी पाहतात अति आत्मविश्वास व  अहंकार, एकाधिकारशाही, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे, विकास कामावर न बोलता खालच्या दर्जाची एकमेकांवर  केलेली टीका या सर्व गोष्टीला सर्वसामान्य जनता कंटाळून गेल्यामुळेच महायुतीच्या विरोधात मतदान करावे लागले हे अस स्पष्ट झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....