"अब आयेगा मजा...भाजपा ची धुंदी घटक पक्ष उतरवणार "
पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरामधून एन डी ए या आघाडीला 293 जागा मिळालेल्या असून भाजपा पक्षाला 239 जागा या मिळवत्या आल्या. अन्य मित्र पक्षांची गोळा बेरीज ही 293 पर्यंत जाऊन थांबते.
2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत होते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत मित्र पक्ष देखील होते. या सर्वांची गोळा बेरीज करून प्रचंड बहुमत हे तत्कालीन काळामध्ये भाजपाला मिळालेले होते. परंतु आजच्या सद्य घडीला भाजपाने आपल्या पक्षाचे तीनशे जागा या निवडणुकीत निवडून येतील, आणि अन्य मित्र पक्षाची काही उमेदवार निवडून आल्यास याची संख्याही 400 पार होऊन जाईल असे त्यांचे अंदाज होते. परंतु या निवडणुकीतील निकालामुळे भाजपाचा अंदाज हा चुकलेला आहे असे दिसून येते.
गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपाने अन्य घटक पक्षांना दुय्यमतेचे स्थान देऊन त्यांना म्हणावे असे महत्त्व देण्यात आलेले नव्हते. परंतु आजच्या घडीला मित्र पक्षांना जवळ केल्याशिवाय किंवा त्यांना महत्व दिल्याशिवाय भाजपा हे सरकार स्थापन करू शकणार नाहीत हे तेवढेच खरे आहे. बिहार मधील नितीश कुमार त्याचप्रमाणे आंध्रा मधील चंद्राबाबू नायडू यांच्या मित्र पक्षांना सोबत घेतल्याशिवाय मोदी हे आपले मोदी सरकार बनवू शकणार नाहीत हेही तेवढेच खरे.
देशातील विरोधी पक्ष म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस व अन्य मित्र पक्षांची इंडिया आघाडी या आघाडीला 232 ते 34 जागा या प्राप्त झालेल्या आहेत. सत्ताग्रहणासाठी लागणारा मॅजिक आकडा 272 हा मॅजिक आकडा गाठण्यासाठी इंडिया आघाडी ही नितेश कुमार त्याचप्रमाणे चंद्राबाबू नायडू व अन्य राजकीय नेतेमंडळींना मोठमोठ्या पदाची आमिषे दाखवून ते आपल्या इंडिया आघाडीचा सोबत सामील करून घेऊ शकतात. नुकतीच नितीश कुमार यांना उपपंतप्रधान या पदाची ऑफर दिल्याची समजते. त्याचप्रमाणे चंद्राबाबू नायडू यांना देखील मोठ्या पदाची ऑफर दिली जाऊ शकते. गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपासोबत असणारे अन्य मित्र पक्ष हेदेखील भाजपाच्या एक कलमी कार्यक्रमाला व एकाधिकारशाही कंटाळलेले असंख्य पक्ष आहेत. यांनी जरी ठरवले तर भाजपा ही सत्तेपासून दूर राहू शकते. आजच्या घडीला भाजपासोबत असलेले अन्य मित्र पक्ष यांना आज मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज घडीला भाजपाची सत्तेची धुंदी उतरवण्याची काम हे भाजपासोबत असलेले मित्र पक्ष करू शकतात एवढे मात्र खरे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा