"महायुतीचे टरबूज ठाकरे,पवार यांनी फोडले".… मुंबई भाजपामय करण्याचे स्वप्न भंगले. महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा

पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण जगभरामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जाणारा भारत देश. या देशांमध्ये लोकशाही ची राजवट असून या लोकशाहीच्या राजवटीमध्ये मतदानाच्या माध्यमातून सत्ताधारी निवडण्याचे अधिकार येथील सर्वसामान्य जनतेला आहे. या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदानाच्या माध्यमातून देशातील जनता आपल्याला आवश्यक असलेले  सरकार ते आपल्या मतदानाच्या माध्यमातून निवडून देत असते. 
      संपूर्ण देशभरामध्ये आज 543 एकूण लोकसभेच्या जागा या आहेत. या जागेमध्ये एनडीएच्या 293 जागा त्यांनी मिळवलेल्या असून त्याचप्रमाणे इंडिया यांनी 234 जागा मिळवल्या. व इतर अशा 16 जागा या निवडून आलेले आहेत. भाजपा सरकारने 400 पार चा नारा देत आपल्या प्रचार मोहिमेस सुरुवात करीत, त्यांनी संपूर्ण भारत देशामध्ये प्रचार दौरा करून देखील त्यांना अपेक्षित असे 400 पार ही संख्या काढता आली नाही. 
     महाराष्ट्रामध्ये भाजपा त्याचप्रमाणे शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या सरकार कडून ही लोकसभेची निवडणूक लढवण्यात आली. परंतु त्यांना अपेक्षित असे यश प्राप्त झालेले नाही. सुरुवातीला भाजपाच्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणि भाजपाच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागांपैकी 45 जागा या आम्ही जिंकू असे या महायुतीच्या नेत्यांनी सर्वत्र जाहीर सभेमध्ये बोलून दाखवले होते. परंतु त्यांना या निवडणुकीमध्ये 45 जागेच्या ऐवजी या महायुतीला फक्त 17 या जागा मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ,काँग्रेस या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ३०  जागा या जिंकत त्यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकारला दाखवून दिलेले आहे.  की भाजपाने आज पर्यंत या महाराष्ट्रामध्ये तसेच देशांमध्ये जाती जातीमध्ये मध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण केले गेले. त्याचप्रमाणे वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालाला भाव न मिळणे बेरोजगारांच्या तरुणाला हाताला काम न मिळणे.मराठा आरक्षण ,धनगर आरक्षण अशा असंख्य गोष्टीमुळे भाजपा सरकार हे पराभूत झाल्याचे आज दिसून येत आहे. महायुतीचे हे भले मोठे पक्ष फोडाफोडीचे धोरण आणि मस्त वालपणाची भाषा बोलणाऱ्या नेत्यांचे टरबूज  फोडण्याचे काम शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केल्याचे आज दिसून येत आहे.
    या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे पूर्णता पराभव झाल्याचे आज महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला तसेच एखाद्या राजकीय व्यक्तीला ईडी ,सीबीआय याची भीती दाखवून किंवा त्याच्यावर कारवाई करून जो काही गैरप्रकार चालविला होता. त्याचप्रमाणे अन्य लहान पक्षांना संपुष्टात आणण्याचा केलेला प्रयत्न, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसणे, बेरोजगारांच्या तरुणाला हाताला काम न मिळणे आणि वाढती महागाई आणि जाती जाती मधील द्वेष पसरवण्याचा केलेला प्रयत्न, धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे धोरण हे महायुतीला आज महागात पडल्याचे दिसून येत आहे. 
      उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून त्याचप्रमाणे शरद पवार यांची राष्ट्रवादी पक्षाला फोडून भाजपाच्या नेतेमंडळींनी सत्ता स्थापनेचे जे काही राजकारण केले गेले, याला जनतेने ओळखून त्यांचा पराभव या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने केलेला आहे. हेच आज आपल्याला दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....