"दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकची इसबावी येथे नवीन शाखेचा शुभारंभ"
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड पंढरपूर. या बँकेची नवीन शाखा पंढरपूर शहरातील उपनगर इस बावी या भागामध्ये बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेची नवीन शाखेची उद्घाटन सोहळा होणार आहे.
अशी माहिती विद्यमान चेअरमन सोमनाथ सदाशिव डोंबे व विद्यमान व्हाईस चेअरमन विजयकुमार कांतीलाल कोठारी यांनी आज रोजी दिली.
व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी तसेच गरजू उद्योजक, गोरगरीब, कामगार, कष्टकरी तसेच शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखली जाणारी दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँक. या बँकेच्या अन्य भागामध्ये शाखा असून कुर्डूवाडी, टेंभुर्णी, महूद, करकंब,पंढरपूर येथील मार्केट यार्ड शाखा, आणि मुख्य शाखेच्या बरोबरीनेच आता इसबावी या परिसरातील ग्राहकांच्या सेवेसाठी या भागामध्ये दि.पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची नवीन शाखा सुरू होणार आहे.
दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेने ग्राहकांच्यासाठी विविध योजना या सुरू केलेल्या असून त्या योजनेमध्ये नवीन गृह स्वप्न योजना, पुष्पक सारथी वाहन तारण योजना, घर दुरुस्ती योजना, कृषी मित्र बेदाणा रिसीट तारण कर्ज, त्याचप्रमाणे सोने तारण कर्ज, सुखाचे सोबती ज्येष्ठ नागरिकांना धन संचयनी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मुंबई कर्ज योजना लागू अशा विविध योजना या बँकेने सुरू केलेले असून या बँकेने ग्राहकांच्यासाठी अन्य सुविधा देखील उपलब्ध करून दिलेले आहेत. एटीएम सुविधा, आरटीजीएस सुविधा, लॉकर सुविधा, क्यू आर कोड सुविधा अशा नाविन्यपूर्ण सुविधा,दि. पंढरपूर को-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांच्या साठी उपलब्ध केलेल्या आहेत.
ग्राहकांचे हित जपणे त्याचप्रमाणे ग्राहकांना तत्परतेने कर्ज वाटप करणारी व सभासद ठेवीदारांचे हित जपणारी बँक म्हणून पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते.
इसबावी येथील नवीन शाखेचे उद्घाटन सोहळा ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते होणार असून या सोहळ्यास उपस्थित बँकेचे विद्यमान चेअरमन सोमनाथ सदाशिव डोंबे विद्यमान व्हाईस चेअरमन विजयकुमार कांतीलाल कोठारी हे उपस्थित होणार असून या बँकेच्या इसबावी येथील नवीन शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे संचालक मंडळ तसेच मॅनेजमेंट सदस्य व शाखा अधिकारी व्यवस्थापक हे उपस्थित राहणार आहेत. तरी बँकेचे सभासद व ग्राहक यांनी या इसबावी येथील शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे. अशी विनंती बँकेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन यांनी केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा