"पंढरपूरातील धोकादायक इमारती न.पा.पाडू लागले "
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील धोकादायक इमारती या शहरातील मोक्याच्या ठिकाणी तसेच लहानशा बोळामधून या धोकादायक इमारती असून अशा धोकादायक इमारतींना पंढरपूर नगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.
या धोकादायक इमारतीच्या संख्या 113 असून अशा धोकादायक इमारतींना नोटीस बजावल्या आहेत. त्यापैकी सहा धोकादायक इमारती या त्या इमारतीच्या मालकाने स्वतःहून पाडलेल्या आहेत. आणि त्याच प्रमाणे नगरपालिकेने धोकादायक चार इमारती या पाडलेल्या असून उर्वरित एकशे तीन धोकादायक इमारती या शिल्लक असून त्या देखील खाली करण्याच्या प्रयत्नामध्ये नगरपालिका असल्याचे नगरपालिकेतील प्रशासन विभागाने सांगितले.
श्री विठ्ठल रुक्मिणी ची दर्शन ही गोपाळपूर पासून सुरू होत असते. नदी कडील बाजूला असलेले पंचमुखी मारुती मठ या मठाची एक बाजू दर्शन रांगेला लागून असल्याने त्या मठाची भिंत देखील धोकादायक असल्याने ती पाडण्यात येत आहे.
सध्या पाऊस काळ सुरू असल्यामुळे तसेच येणाऱ्या आषाढी यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात. या भाविकांची व पंढरपूर शहरातील रहिवाशांची जीवित हानी होऊ नये म्हणून अशा धोकादायक इमारती या खाली करून पाडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर नगरपालिकेने अशा धोकादायक इमारतींना नोटीस बजावले आहेत. या नोटीसची अंमलबजावणी व धोकादायक इमारती खाली करण्याचे सध्या शहरांमध्ये दिसून येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा