पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला मंत्रीपद का मिळू नये ॽ.

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर विधानसभा मतदारसंघ झाल्यापासून ते आजपर्यंत या मतदारसंघाला मंत्रीपद हे लाभलेले नाही. काही वर्षांपूर्वी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना मंत्रिपदाच्या दर्जाचे एसटी महामंडळ या महामंडळाचे अध्यक्ष पद मिळाले होते. तदनंतर भारत भालके यांनी तीन वेळा आपली विधानसभेची टर्म पूर्ण केली. त्यांना देखील असे महामंडळ किंवा मंत्री पद मिळालेले नाही. आणि आज या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचेआमदार समाधान आवताडे आणि त्याच प्रमाणे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक या अभ्यासू आणि कार्य तत्पर असलेल्या युवा लोकप्रतिनिधींची मंत्रिमंडळामध्ये त्याचप्रमाणे एखाद्या कुठल्या महामंडळामध्ये वर्णी लागलेली नाही.

     सध्याची भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या भाजपाच्या प्रचाराची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली होती. घोगडी बैठक ही नवीन कल्पना त्यांनी ग्रामीण भागामधील वाड्यावस्त्यावर

 त्याचप्रमाणे गावामधून त्यांनीही घोंगडी बैठकीचे आयोजन करून जनतेशी सरळ संवाद त्यांनी साधलेला होता. त्यांच्या बरोबरीने विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे देखील सहभागी होते. घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे मन परिवर्तन करण्याचे काम आणि भाजपाने केलेल्या आजपर्यंतच्या कार्याची माहिती त्यांनी या ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील लोकांचा घरांमध्ये जाऊन त्यांनी सांगितले होते. परंतु त्यांनी केलेल्या या प्रयत्नाला यश जरी लाभले नसले तरी येणाऱ्या विधानसभा च्या निवडणुकीमध्ये त्यांनी केलेला हा प्रचार लोकसभेचा प्रचाराच्या माध्यमातून भाजपाची ध्येय धोरणे व केलेली कामे त्यांनी जनतेपर्यंत सांगण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत. 

    संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या विरोधातली असलेली ही लाट आणि या लाटेमुळे भाजपाच्या उमेदवाराला म्हणावं असे मतदान होऊ शकले नाही. भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. या पराभवाची कारणे विविध जरी असली तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपाचे प्रस्थ आहे. भाजपाला मांनणारे मतदार आहेत. 

     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकीर्दी मध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी  त्यांनी शासनाकडून खेचून आणून या निधीचा योग्य तो वापर करण्यामध्ये ते अग्रेसर ठरलेले आहेत. त्यांनी केलेली कामे त्याचप्रमाणे विविध योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्याची त्यांनी केलेली काम ही सर्वसामान्य जनता ही विसरणार नाही. येत्या विधानसभेमध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे समाधान आवताडे हे सहज निवडून येतील. असे आशादायी वातावरण सद्यस्थितीला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील दोन आजी माजी आमदार हे उच्चशिक्षित असून त्यांना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आहे. सर्वसामान्यांचे कामे ही तत्परतेने करण्याची यांचे कौशल्य आहे. भाजपा पक्षाला जर का या परिसरामध्ये वाढवायचे असेल तर या दोन्ही आजी माजी आमदारांना भाजपा ने सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे.   

   आमदार समाधान आवताडे हे स्वतः उच्चशिक्षित असून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपद मिळाल्या स ते आपल्या कार्याची झलक आणि पक्ष वाढीसाठी ते मंत्रीपद लाभदायक ठरणार आहे. 

     येत्या काही दिवसातच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या विचारात आहे. तरी या होऊ पाहणाऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तारामध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आमदार समाधान आवताडे आणि त्याच प्रमाणे माजी विधानसभा आमदार प्रशांतराव परिचारक यांना मंत्री पद किंवा एखादे महामंडळाचे अध्यक्ष पद मिळावे. अशी सर्वसामान्य जनतेची व कार्यकर्त्यांची मागणी आहे.   

     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला मंत्री पद लागल्यास या दोन्ही तीर्थक्षेत्राचा विकास हा झपाट्याने होणार आहे. आणि या दोन्ही तालुक्यातील तरुण बेरोजगारांना एमआयडीसीच्या माध्यमातून तसेच पंढरपूर येथील क्षेत्र त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे येथील  लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. व आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....