"डाॅक्टरं....तुझे सुरज कहूॅं की शैतान" ? डॉ.ऋचा रुपनवर( पाटील) आत्महत्या प्रकरण.... जनतेतून संतप्त सवाल.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) सर्वसामान्यांच्या आरोग्याची जपणूक करणारा म्हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित आणि व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉक्टर या डॉक्टरी पेशाला समाजामध्ये एक मानाचे स्थान आहे. सर्वसामान्य लोक दुर्धर आजारी पडल्यानंतर किंवा मरणासन्न अवस्थेमध्ये असलेला एखादा पेशंट हा डॉक्टरकडे देवाच्या रूपामध्ये तो पाहत असतो. परंतु सांगोला तालुक्यामध्ये घडलेली नुकतीच एक घटना ती घटना म्हणजे सांगोला तालुक्यातील एक बडे उद्योग  समूहाचे मोठे प्रस्थ भाऊसाहेब रुपनवर म्हणून यांना ओळखले जाते. त्यांच्या विविध उद्योग समूह च्या माध्यमातून ते सांगोला तालुका तसेच अन्य तालुक्यामधून सुप्रसिद्ध आहे. या भाऊसाहेब रुपनवर यांचे चिरंजीव डॉ. सुरज रुपनवर यांचा विवाह ऋचा पाटील या डॉक्टर तरुणीशी झाल्यानंतर त्यांच्या विवाह नंतर थोड्याच दिवसांमध्ये दोघांमध्ये तक्रारी सुरू झाल्या. डॉ. सुरज यांचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ऋचा पाटील यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतल्याने  त्यांच्यामध्ये तक्रारी सुरू झाल्या. सूरज रुपनवर यांनी डॉ. ऋचा पाटील यांना मारहाण तसेच मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. आणि डॉ. ऋचा पाटील यांच्या नावे असलेली पंढरपूर शहरातील जागेवर वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असलेले एम आर आय हे मशीन आणण्यासाठी पैसे आण म्हणून तगादा लावला. ऋचा पाटील यांच्या पाटील कुटुंबीयांनी  व घरच्या लोकांनी दोघांच्यामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉक्टर सुरज रुपनवर हे सुधारण्याच्या पलीकडे गेल्यामुळे त्याने आपले वर्तन तसेच सुरू ठेवले. मारहाण व असंख्य मानसिक छळा मुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

     डॉ. ऋचा पाटील या स्वतः एमडी डॉक्टर असून त्यांनी हे आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. आपल्या दोन लहान मुलांच्या कडे पाहून त्या डॉ. सुरज रुपनवर यांचा त्रास मारहाण या त्या सहन करत होत्या. परंतु दिनांक सहा जून रोजी त्या सांगोला येथील फॅबटेक इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलच्या शेजारी राहत असलेल्या बंगल्यामध्ये पहाटे सातच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

      डॉ. ऋचा पाटील यांनी केलेल्या आत्महत्या मुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली असून डॉ. ऋचा पाटील यांच्या भावाने व अन्य नातेवाईकांनी सांगोला पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे .आरोपी डॉ. सुरज रुपनवर यांना त्वरित अटक करावी. अशी त्यांनी मागणी केली आहे .परंतु आजतागत डॉ. सुरज रुपनवर यांना अटक झालेली नाही. 

     आज दिनांक 12 जून रोजी पंढरपूर शहरातील सर्व डॉक्टर तसेच नर्स अन्य वैद्यकीय सेवा करणारे कर्मचारी यांनी काळीफित लावून त्यांनी निषेध व्यक्त केला.आज या डॉ. सुरज रुपनवर ला त्वरित अटक करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख ग्रामीण सर देशपांडे यांना निवेदन देऊन या निवेदनामध्ये डॉ. सुरज रुपनवर यांना अटक केली जावी. तसेच त्यांचे पासपोर्ट हे रद्द करण्यात यावे. आणि सांगोला पोलीस स्टेशनचे निरीक्षक हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांच्याकडून हा तपास काढून घेतला जावा व अन्य अधिकारी नेमला जावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच या आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या मुळे डॉक्टर सुरज रुपनवर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी देखील त्यांनी केली. सीआयडीच्या माध्यमातून या प्रकरणाचा  तपास व्हावा. अशी मागणी आज रोजी पंढरपूर शहरातील सर्व डॉक्टर मंडळींनी केली. 

      डॉ. सुरज रुपनवर यांना त्वरित अटक  झाली पाहिजे अशी मागणी करत त्याची अटक न झाल्यास संपूर्ण पंढरपूर शहर त्याचप्रमाणे जिल्हा व महाराष्ट्र भर आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

     या निवेदन देण्याच्या साठी पंढरपूर शहरातील महिला डॉक्टर तसेच पुरुष डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांमध्ये कार्यरत असलेले नर्स व फार्मासिस्ट हे उपस्थित होते.

      पंढरपूर शहरातील जनता ही आज एक संतप्त सवाल विचारत आहे. डॉक्टर ," तुझे सुरज कहूॅं की शैतान कहूॅं "असा संतप्त सवाल पंढरपूर वासी करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....