"धकधक करने लगा" माढा, सोलापूर लोकसभा उमेदवारांची अवस्था.
पंढरपूर( प्रतिनिधी) उद्या देशभरातील लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निकालाची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला तसेच उद्योगपती, बेरोजगार तरुण ,शेतकरी, कष्टकरी ,आणि लोकशाहीला सर्वोच्च स्थानी मानणारे सर्वसामान्य जनता, तसेच विचारवंत, बुद्धिवंत या लोकसभेच्या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहे.
देशातील विविध पक्षाचे उमेदवार राष्ट्रीय पक्ष काँग्रेस, भाजपा, राजद, तसेच असंख्य प्रादेशिक पक्ष या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली धडपड ही गेली कित्येक दिवसापासून आपण पाहत आहोत. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, कष्टकरी शेतकरी बेरोजगार तरुण महिलांचे प्रश्न हे संसदेमध्ये आग्रह हक्काने मांडून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपण केलेले कार्य त्याचप्रमाणे आपण येत्या पंचवार्षिक मध्ये कोण कोणते विकास कामे करणार आहोत. याची माहिती व जाहीरनामा त्यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली आहे.
सर्वपक्षीय उमेदवारांची आजच्या घडीला त्यांची झालेली अवस्था ती पाहता "धकधक करने लगा मोरा जियारा डरने लगा" या गाण्याच्या पंक्तीप्रमाणे अवस्था झाल्याची सद्यस्थितीला दिसून येत आहे.
आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा व काँग्रेस आय त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवारांना आपणच निवडून येणार, आपणच दिल्लीच्या दरबारी सर्वसामान्यांचे दुःख मांडणार त्यांच्यासाठी योजना आणणार अशी स्वप्न पहात असलेले हे उमेदवार उद्या त्यांची कसोटीचा त्याचप्रमाणे त्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल लागणार आहे.
माढा लोकसभा मतदार संघामधून भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या पंचवार्षिक कारकिर्दीमध्ये काहीच विकास कामे केलेली नाहीत. अशी तक्रार सर्वसामान्यांच्या दरबारामध्ये घेऊन जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढणारे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार व त्यांनी केलेली कामे हे सर्व पाहता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्ली दरबारी तुतारी वाजणार की काय? अशी चर्चा माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हे उशिरा ठरल्यामुळे त्याचप्रमाणे स्थानिक उमेदवार असायला हवा म्हणून आग्रह धरणारे सर्वसामान्य जनता आणि भाजपाने दिलेला रामभाऊ सातपुते हे उमेदवार उपरा म्हणून त्यांना हिणवलं गेलं. त्यांनी सुरुवातीला प्रचाराच्या दौऱ्यामध्ये कासव गतीने सुरुवात करत करत त्यांनी आघाडी घेत चांगली घोडदौड शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू ठेवली प्रचाराच्या माध्यमातून भाजपाचे ध्येयधोरणे त्यांनी सर्वसामान्य जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे याच लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आपली उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर पासूनच प्रचारदौरे गाव भेटीच्या माध्यमातून त्यांनी सुरू केला होता. त्यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी पुन्हा एकदा गाव भेटीच्या माध्यमातून दोन ते तीन वेळा त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. व भाजपाच्या चुकीच्या ध्येय धोरणाची त्यांनी केलेली मांडणी ही सर्वसामान्य जनतेला पटवून देण्यात या यशस्वी ठरल्या. प्रणिती ताई या निवडून येणार अशी चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत मतदार संघामध्ये सुरू होती. निवडणूक झाल्यानंतर देखील प्रणिती ताई शिंदे याच निवडून येणार. अशी चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत सुरू असल्याची दिसून येत आहे. चला तर पाहूया उद्या या सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची "धकधक" वाढते की कमी होते हे आपल्याला पाहायचं आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा