"भाजपात आम्ही असलो की चांगले भाजपा सोडून बाहेर गेलं की आम्ही वाईट असे दुटप्पी धोरण भाजपाचे आहे"...... धैर्यशील मोहिते पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघ 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगलेच घोंगावत आहे.
आज अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गट त्याचप्रमाणे शेकापा व अन्य सहयोगी पक्षाच्या वतीने जाहीर सभा अकलूज येथे झाली.
या जाहीर सभेस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राजेश टोपे ,उत्तम जानकर, साईनाथ अभंगराव, जयंत पाटील असे मान्यवर उपस्थित होते
माढा लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये ते पुढे बोलत असताना म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सर्व तालुक्याचा गाव भेट दौरा करून या मतदारसंघांमधील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरूण यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला .त्याचप्रमाणे त्यांना भेडसावणारे ज्वलंत प्रश्न अडीअडचणी समस्या या जाणून घेऊन त्यांनी या सर्वसामान्य शेतकरी वर गरिबाच्या पाठीशी उभे राहायचं ठरवलं आहे .या परिसरातील लोकांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या कार्याचे कौतुक व माहिती या भागातील लोकांनी दिली. विजयसिंह मोहिते पाटील यांनी कधीही हा परिसर पाण्यापासून वंचित ठेवला नाही. या भागात येणारे सर्व तालुक्यांना उजनी धरणाच्या माध्यमातून पाण्याची सोय शेतीला,व पिण्याचे पाणी यासाठी केली. कधीही या परिसरामध्ये दुष्काळजन्य स्थिती जाणवू दिली नाही. उजनी धरणामध्ये पाणी कमी असताना देखील पाण्याचे योग्य नियोजन करून या माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला पाणी देण्याचे काम केलेले आहे.
या माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला पाणीदार करण्याचे मी ठरलेले आहे. या भागातील शेतकऱ्याला पाणीदार बनवून त्याचं रान शिवार हिरवगार केल्याशिवाय मी राहणार नाही. या परिसरातील शेतकऱ्याला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करणार आहे.
मोहिते पाटील कुटुंब ज्यावेळी भाजपात होते त्यावेळी "ते अतिशय चांगले आहेत. असे हे भाजपचे नेते सांगत होते आज आम्ही भाजपाच्या दुटप्पी धोरणाला कंटाळून आणि कर्तुत्व शून्य नेतृत्व याला कंटाळून आम्ही भाजपा ला रामराम केला आहे आता हेच भाजपाचे लोक आम्हाला वाईट म्हणतात. आमच्यावर खोटे आरोप करीत आहेत. या माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आमच्या कुटुंबाला चांगले प्रकारे ओळखतात. आमचं कार्य या सर्वांना माहीत आहे. भाजपाने फक्त आमचा कुटुंबावर टीका करण्या व्यतिरिक्त त्याने काही केलेले नाही. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांच्या हिताचं धोरण या भाजपा सरकारने राबवलेले नाही. अशी टीका माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज केली.
माढा लोकसभा मतदारसंघातील फळबागा त्याचप्रमाणे अन्य पीके ही उच्च दर्जाची आहेत. ही पिके, फळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्यात केल्यास या भागातील केळी, द्राक्षे, डाळिंब, चिकू, बोर या फळांना चांगला दर येतो आहे .या भागातील शेतकऱ्यांना सर्व बाबतीत बळ देण्याचे काम आम्ही करणार आहोत. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार साहेबांचे व विजय दादा यांचे संबंध हे अद्याप ही चांगले आहेत. विजय दादा व शरद पवार यांचे नेहमी गाठभेट होत असते व सर्व विकास कामावर त्यांची चर्चा होत असते. शरद पवार साहेब आणि मोहिते परिवार यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. विजयसिंह दादा हे अद्यापही राष्ट्रवादीमध्येच आहेत. हे देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी आवर्जून सांगितले.
आज रोजी अकलूज येथे झालेल्या या सभेला हजारोच्या संख्येने लोकसमुदाय हा लोटला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा