"तू किस झाड की पत्ती " अजित पवार. उमेदवार निलेश लंके विषयी चे वक्तव्य.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार सभेचा अंतिम टप्पा सुरू असताना नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर कडाडून टीका करीत असताना ते म्हणाले निलेश लंके यांना त्यांच्या मतदारसंघासाठी भरपूर निधी देण्यात आला. परंतु ते आम्हाला सोडून गेले. त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे हाताची मुठ बंद आहे, आता मुठ उघडायची वेळ आली आहे. असे ते म्हणाले निलेश लंके यांच्या विषयी एकरी शब्दात "तू किस झाड की पत्ती" असे देखील तुच्छपणाने त्याने आपल्या प्रचार सभेमध्ये त्यांचा उल्लेख केला. 

    अजित पवार यांच्या सडेतोड बोलण्याने अनेक जणांची मने दुखावले गेलेले आहेत. काही वर्षापूर्वी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या विषयी देखील त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये "उद्याच्या विधानसभेमध्ये तू दिसणार नाही." असे म्हणून विजय शिवतारे यांना पराभूत केले होते.  याचा रोष देखील विजय शिवतारे यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दर्शविला होता. 

     सतत वरिष्ठ नेत्यांना त्याचप्रमाणे सहकारी नेतेमंडळींना, अधिकाऱ्यांना खडसावून बोलण्याच्या त्यांच्या शैलीमुळे असंख्य लोक नाराज झाल्याचे देखील आपण पाहिले आहेत. शरद पवार यांची पुतणे असल्यामुळे, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या या बोलण्याकडे लोक दुर्लक्ष करतात. हे नाराज झालेले लोक शरद पवार यांच्या गटामध्ये सामील होऊन ते अजित पवारांना सद्या विरोध दर्शवित आहेत. अजित पवार यांच्या कित्येक वक्तव्याने सत्ताधारी भाजपा व शिंदे सरकार यांना अनेक वेळा अडचणीत आणल्याचे आपण पाहिले आहे. मध्यंतरी पुणे येथील व्यापारी संघाच्या मीटिंगमध्ये त्यांनी "कचाकच बटन दाबा मी कचाकच निधी देतो"  असे बोलून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. 

    शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर देखील त्यांनी टीका केली आहे. शरद पवार यांचे वय झाले आहे., त्यांनी आता घरी बसावे., याचप्रमाणे शरद पवार यांनी माझ्याबरोबर भेदभाव केला. मी मुलगा नसल्यामुळे माझी हेटाळणी केली. मला कमी लेखले गेले. मुलीला संधी दिली. असे असंख्य टिकीचे शस्त्र त्यांनी शरद पवार यांच्यावर सोडले होते. अजित पवार यांच्या अशा वक्तव्यामुळे भाजपा त्याचप्रमाणे शिंदे सरकार हे अडचणीत येत चालल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. लोक नाराज होऊन शरद पवार यांच्या गटामध्ये सामील होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

     कथीत घोटाळ्याच्या चौकशीचे संकट टाळण्यासाठी त्याने भाजपा व शिंदे शिवसेना सरकारमध्ये सामील झाले. असे बोलले जाते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारार्थ दौऱ्यामध्ये सभेमधून शरद पवार यांच्यावर जास्तीत जास्त टीका करावी., व खालच्या पातळीची टीका करावी. असे आदेश कदाचित आल्यामुळेच अजित पवार हे सर्व नेतेमंडळीवर टीका करीत सुटले की काय?  अशी शंका देखील लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. 

     अजित पवार यांचा स्पष्ट पणा व एखाद्या नेत्याचा तसेच कार्यकर्त्याचा एकेरी उल्लेख करणे, त्यांना खडसावणे या सर्व गोष्टी त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डोकेदुखीच्या ठरणार आहेत. एवढे मात्र निश्चित.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....