"श्री मुदगुलेश्वर देवस्थान कडे जाणारा रस्ता कधी दुरुस्त होणार?"भाविकांचा संतप्त सवाल.


 पंढरपूर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील सिंदफळ या गावी असलेले श्रीमुदगुलेश्वर देवस्थान हे महादेवाचे पुरातन मंदिर असून, या मंदिराला या परिसरातील तसेच राज्यभरातील भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. तुळजापूर बार्शी रोडवरील एक किलोमीटर अंतरावर असलेले हे महादेवाचे मुदगुलेश्वर मंदिर आहे. या मंदिराकडे जाणारा एक किलोमीटर रस्ता हा पूर्णता खड्डेमय झालेला असून या रस्त्याची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. या मंदिराला या परिसरातील असंख्य भाविक लोक कार, मोटरसायकलवर तसेच पायी जात असतात. हा रस्ता दुतर्फा निसर्गरम्य झाडांनी नटलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे श्री मुद्गुलेश्वर देवस्थान हे महादेवाचे मंदिर असून या मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास असून हे प्राचीन पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या आजूबाजूला संपूर्णतः झाडी असून असंख्य झाडांच्या मध्ये असलेले हे श्री मुद्गुलेश्वर मंदिर भाविकांना मनशांती तसेच समाधान देणारे हे मंदिर आहे. अशी आख्यायिका या परिसरामध्ये ऐकवली जाते. 

     या मुदगुलेश्वर मंदिराचे पर्यटन विकास च्या वतीने पर्यटन क्षेत्र म्हणून या भागामध्ये विविध सुख सोयी सुविधा या उपलब्ध करून देण्यात यावेत. अशी मागणी या मंदिराला येणारे भक्त करीत आहेत. तुळजापूर तालुक्याचे भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या विशेष निधीमधून या परिसराला जोडणारा रस्ता हा लवकरात लवकर दुरुस्त करून व्हावा. अशी मागणी देखील भाविक लोक करीत असताना दिसून येत आहेत. तुळजा पुरातील आई तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर भावीक भक्त या श्री मुदगुलेश्वर देवस्थानला आवर्जून भेट देत असतात. तरी महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकार यांच्या माध्यमातून पर्यटन विकास निधीच्या माध्यमातून या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी तसेच अन्य भावीक भक्तांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. अशी मागणी भाविक लोक करीत असताना दिसून येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....