"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य स्टॅंडिंग शो संपन्न" आयोजित शिवसेना शहरप्रमुख विश्वजीत ( मुन्ना)भोसले.मित्रमंडळ.पंढरपूर
पंढरपूर (प्रतिनिधी) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंढरपूर येथील कर्नल भोसले चौक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगाच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने,त्याचप्रमाणे देशभक्ती जागृत करण्याचे उद्देशाने शिवसेना शिंदे गट चे पंढरपूर शहर प्रमुख विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आयोजित केलेल्या या स्टॅंडिंग शोचे कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने या स्टँडिंग शोचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित शिवसेनेचे अनिल सावंत साहेब, संभाजी ब्रिगेडचे दीपक दादा वाडदेकर, काँग्रेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे, पंढरपूर मर्चंट बँकेचे तज्ञ संचालक श्याम भोगाव सर, कर्नल भोसले चौकाचे आधारस्तंभ किरण आप्पा भोसले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते.
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या शौर्याची गाथा या स्टॅंडिंग शोच्या माध्यमातून तरुण पिढीला दर्शन घडवले. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या पराक्रमाची, तसेच स्वराज्य रक्षणासाठी धर्मवीर संभाजी राजे यांनी दिलेले बलिदान याची आठवण व्हावी. म्हणून पंढरपूर शहर शिवसेना प्रमुख विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी हा स्टॅंडिंग शो कार्यक्रम आयोजित करून तरुण पिढीला महापुरुषांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती व ओळख या माध्यमातून करण्यात आली.
कर्नल भोसले चौक या ठिकाणी आयोजित केलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीच्या निमित्ताने या स्टँडिंग शो ला उपस्थित हजारोंच्या संख्येने शिवशंभू प्रेमी जनता उपस्थित होती. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बहुलौकिक कार्याची, पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण यानिमित्ताने झाली.
हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्नल भोसले चौक येथील असंख्य कार्यकर्ते यांनी योगदान देऊन हा कार्यक्रम पार पाडला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा