" पंढरपुरात होऊ पाहणाऱ्या राजकीय भूकंपात कार्यकर्त्यांचे, सभासदांचे काय होणार ?"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) लोकसभेची निवडणूक देशभरात सर्वत्र लागलेले असताना, महाराष्ट्रातील  सोलापुर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघांमधील जनतेमध्ये प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या विरोधात सर्वत्र रोष दिसून येत असताना त्याचा लाभ घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें ,विजयसिंह मोहिते पाटील आधी ज्येष्ठ मंडळी ही माढा लोकसभा मतदार संघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात मधून भाजपाच्या विरोधात जनसंवादाच्या माध्यमातून भाजप विरोधी वातावरण निर्माण करण्यामध्ये त्यांनी यश मिळवत असल्याचे सध्या दिसून येत असताना पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे भाजपाच्या गळाला लागतात की काय?  असे सद्य घडीला वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

     दोन दिवसांपूर्वी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या साखर गोडाऊनला कर्ज न फेडल्याचे कारण सांगून त्या साखर गोडाऊनला सील करण्यात आल्याचे समजते. या गोडाऊन मधील साखर विक्री झाल्यानंतरच कर्ज फेडले जाऊ शकते. असे असताना देखील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कर्ज न पडल्याच्या कारणास्तव ते साखरेचे गोडाऊन सील करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण ऊस उत्पादक सभासद त्याचप्रमाणे कामगार आणि संचालक मंडळ हे चिंतेत पडल्याचे दिसून येत आहे. आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तप्त होत असताना श्री विठ्ठल साखर कारखान्यावर झालेली ही कारवाई ही कोणत्या उद्देशाने झाली हे सर्वसामान्य जनतेला न समजण्यासारखे ती जनता दुधखुळी नाही.

     श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शरद पवारांना आपले आदर्श नेतृत्व म्हणून त्यांनी स्वीकारले आहे. शरद पवारांच्या तुतारी या चिन्हाला घेऊन ते माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून प्रचार दौऱ्यामध्ये दिसून येत होते. अभिजीत आबा पाटील यांच्या पाठीशी असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद, त्याचप्रमाणे कार्यकर्ते आणि कामगार वर्ग हा अभिजीत पाटील यांच्या पाठीशी असल्यामुळे या  लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा परिणाम होऊ शकतो. याची जाणीव झाल्यामुळेच कदाचित ही कारवाई झाली की काय?  अशी चर्चा आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. 

     या राजकीय खेळीमधून सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासद आणि कार्यकर्ता कामगार वर्ग यांच्या जीवनामध्ये भूकंप घडतोय की काय? अशी अवस्था सध्या पंढरपूर तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. 

     श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईमुळे कार्यकर्ते, ऊस उत्पादक व कर्मचारी हे भाजपाच्या दिशेने जातील की नाही हे सद्यस्थितीला कोणीही सांगू शकत नाही. नेतेमंडळी जरी भाजपात गेली तरी सर्व सामान्य कार्यकर्ता व मतदार जनता ही या नेते मंडळीच्या मागे जाणार आहे, की वेगळा निर्णय घेणार आहे.? याचा अंदाज सध्याच्या घडीला  लागत नसल्याचे दिसून येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....