"राम सातपुते यांच्या विजयासाठी आमदार समाधान आवताडे आणि प्रशांतराव परिचारक यांचे योगदान लाभणार '


 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचाराच्या घोडदौड मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार यांचे योगदान लाभणार आहे. 

      सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी त्याचप्रमाणे सोलापूर शहर मधील भाजपाचे दोन आमदार विजय देशमुख आणि सुभाष देशमुख आणि त्यांना मोहोळ तालुक्यातील राजन पाटील यांचे सहकार्य लाभणार असून यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार असून त्यांनी देखील आणि मोहोळ तालुक्याचे मान्यवर नेते राजन पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे. 

    पंढरपूर तालुक्यातील भाजप आमदार समाधान आवताडे आणि भाजपाचे क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांतराव परिचारक या  दोन्ही आमदारांचे वर्चस्व पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये असून आमदार आवताडे आणि परिचारक यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाची पोचपावती म्हणून सर्वसामान्य जनता ही आमदार अवताडे आणि परिचारक यांच्या पाठीशी राहणार आहे. आवताडे आणि परिचारक यांनी केलेल्या विकास कामा मुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही भाजपाच्या पाठीशी असणार आहे. असे चित्र सद्यस्थितीला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून दिसून येत आहे. 

     आपल्या मंगळवेढा पंढरपूर मतदार संघामध्ये विकास कामासाठी कोट्यावधी रुपयेचा निधी आणून तो निधी विकास कामांमध्ये लावून पंढरपूर शहरामधील रस्ते, पाणी प्रश्न त्याचप्रमाणे अन्य नागरी सुविधा या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे आज सर्वसामान्य जनता ही समाधान आवताडे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहरांमधून केलेली विकास कामे मंगळवेढा शहरांमधून केलेली विकास कामे त्याचप्रमाणे मंगळवेढ्यातील 34 गावाचा पाणी प्रश्न आणि त्यासाठी केलेली त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि महाराष्ट्र शासनाकडून त्यासाठी मंजुरी आणून निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.याची जाणीव मंगळवेढा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला आहे. त्यामुळे समाधान आवताडे आणि परिचारक या दोघांच्या शब्दाला या दोन्ही क्षेत्रांमध्ये वजन प्राप्त झालेले आहे. त्यामुळे राम सातपुते यांना या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून प्रचंड प्रमाणात मतदान मिळणार याची खात्री सर्वसामान्य नागरिक देत आहे. 

     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधला असता आमदार समाधान आवताडे यांनी केलेली विकास कामे त्याचप्रमाणे प्रशांत परिचारक यांनी शेतकऱ्यांचे सोडवलेले प्रश्न आणि विकास कामे ,ऊस उत्पादक व शेतकऱ्यांना दिलेला योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने हे दोन्ही आमदार शासन दरबारी प्रयत्न करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतात. याची जाणीव सर्वसामान्य जनतेला असल्यामुळे हे त्यांच्याशी केलेल्या संवादामधून समजते.

     सातपुते उच्चशिक्षित असून ऊस तोड कामगारांचा मुलगा आहे. गरीब शेतकऱ्यांची हाल अपेष्ठा काय असते हे ते जाणून आहेत. आणि या लोकसभा मतदारसंघांमध्ये राम सातपुते यांना विजयी केल्यास शासन दरबारी सोलापूर मतदारसंघातील असंख्य प्रश्न ते सोडवू शकतात. याची खात्री सर्वसामान्य जनतेला असल्यामुळे राम सातपुते हे भाजपाचे उमेदवार म्हणून सोलापूर लोकसभा मतदार संघामधून निवडून येऊ शकतात. असे देखील जनसंवादामधून जनमत हे कळत आहे.

     पाहूया येत्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये भाजपाच्या पदरी अवताडे आणि परिचारक यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाभते का.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....