"नेहरू, गांधींच्यांवर मोदीने टीका करणे योग्य नाही.मोदी नेहरू यांच्या योग्यतेचे नाही." शरद पवार
पंढरपूर ( प्रतिनिधी) कुठल्याही विकास कामावर न बोलता फक्त नेहरू घराणे आणि गांधी घराण्यावर खालच्या पातळीवरून टीका करणे हे मोदी यांना शोभत नाही. नेहरू गांधी यांच्या योग्यतेचे मोदी नाहीत. असे वक्तव्य आज रोजी पंढरपूर येथे माढा लोकसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आय व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथील शिवतीर्थावर आपल्या जाहीर सभेमध्ये केले.
आपला देश शेतीप्रधान असून या शेतीप्रधान देशांमध्ये अन्नधान्य पिकवणारा शेतकरी हा आज आत्महत्या कडे वळत आहे. त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे पाण्याचे नियोजन हे त्यांनी नीट केलेले नाही. आणि फक्त धन दांडग्यांचे उद्योगपतींचे कर्ज माफ करणे, त्यांना अनेक सवलती उपलब्ध करून देणे एवढेच काम मोदी सरकारने केलेले आहे, मोदी सरकारने जी गॅरंटी दिली आहे, ती उद्योगपती आणि धन दांडग्या लोकांच्यासाठी दिलेली आहे. अशी टीका शरद पवार यांनी आज रोजी केली आहे.
माढा लोकसभा मतदार संघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभेच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे उपस्थित प्रणिती ताई शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील. उत्तम जानकर, होळकर, सुभाष भोसले, सुधीर भोसले, बजरंग बागल आधी ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होते.
शरद पवार यांनी आपल्या जाहीर सभेमध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले मोदी राजवटीमध्ये विरोधकांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांच्या चौकशी या ईडी, सीबीआय यांच्या माध्यमातून करून आणि चौकशीची भीती दाखवून त्यांनी आपल्या पक्षांमध्ये त्यांना सामावून घेण्याचे काम केले आहे.
लोकशाहीला बळकट करण्यासाठी त्याचप्रमाणे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला या भाजप सरकारला घरी बसवायचे आहे. माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना आपल्या सोलापूर जिल्ह्यातील व माढा तालुका माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे कामे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या अडचणी, बेरोजगारांचे प्रश्न ही संसदेमध्ये मांडण्यासाठी प्रणिती ताई शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करा असे आव्हान शरद चंद्र पवार यांनी आज रोजी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा