"माढा लोकसभेची भाजपाची जागा धोक्यात " पालकमंत्री चंद्रकांत पाटील.
पंढरपूर ( प्रतिनिधी) सांगोला येथील कार्यकर्त्यांच्या मेळावा मध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीचा आढावा घेत त्यांनी माढा लोकसभेची जागा भाजपासाठी
धोक्याची ठरू पाहत आहे. असे वक्तव्य केले.
काही दिवसापूर्वीच टेंभुर्णी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेळाव्यामध्ये माढा तालुक्यातील एक मतदार शेतकरी आपल्याला भाजपा सरकारने कसे फसवले असे सांगत असतानाच त्यावेळी या सभेमध्ये जो गोंधळ झाला होता. तो गोंधळ आता सर्वत्र दिसू पाहत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण हा भाजप सरकारला वैतागल्याचे सध्या माढा तालुक्यामध्ये हे चित्र दिसून येत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या मनोगतात पुढे म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा साठी सहज सोपी असलेली ही जागा आता या ठिकाणी निवडून येण्यासाठी असंख्य प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे माढा लोकसभा ची भाजपाची जागा ही सद्यस्थितीत धोक्यात आहे. असे त्यांना जाणवले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी स्वीकारल्यानंतर सध्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाविरोधी वातावरण सद्यस्थितीला दिसून येत आहे. हे सर्व दिसून आल्यामुळेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे वरील वक्तव्य केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा