"माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे कठीण आहे." ... चंद्रकांत पाटील बोलले ते खरेच असणार.
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा, सोलापूर लोकसभा मतदार संघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांमधील भाजपाचे उमेदवार हे अडचणीत असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे.
भाजपा या पक्षाचा राजीनामा देऊन धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावतीने तुतारी हाती घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्याचप्रमाणे उत्तम जानकर हे देखील भाजपा वर नाराज असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे. शरद पवार यांनी उद्याच्या विधानसभेमध्ये त्यांना माळशिरस तालुक्यातून उमेदवारी देणार असल्याचे समजते. आणि मोहिते पाटील देखील त्यांना सहकार्य करणार असल्याचे बोलले जाते. अशी परिस्थिती या मतदारसंघांमध्ये दिसून येत असल्यामुळे भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ही लोकसभा निवडणूक कठीण असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत असल्यामुळेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगोला येथे जे वक्तव्य केले भाजपाचे उमेदवारांना निवडून येणे कठीण आहे. त्याची सत्यता आता जाणवू लागल्यामुळेच ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते हे आता फोन देखील उचलेनासे झाले आहेत. असे चित्र सध्या मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे मूळ रहिवासी बीडचे असल्यामुळे सोलापूर शहरासाठी व जिल्ह्यासाठी ते उपरेच आहेत. अशी भावना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडून आलेले भाजपाचे दोन उमेदवार हे निष्क्रिय ठरल्याचे असल्यामुळे सोलापुरातील या मतदारसंघातील जनता हे नाराजच असल्याचे सध्या दिसून येत आहे.
काँग्रेस आय चे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आपल्या तीन टर्मच्या आमदारकी मधून असंख्य विकास कामे केलेली आहे. त्यांना विकास कामाचा व काम करून घेण्याचा अनुभव असल्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. प्रणिती ताई शिंदे यांना सोलापूर परिसरातील दिलीप माने, माजी आमदार आडम मास्तर, राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे त्याचप्रमाणे शहर परिसरातील चेतन नरोटे व असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते हे त्यांना मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अक्कलकोट परिसरातून सिद्धाराम म्हेत्रे, दक्षिण सोलापूर मधून माजी आमदार गुरुनाथ पाटील यांचे चिरंजीव हरीश पाटील, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी असे असंख्य मातब्बर नेते मंडळी आज प्रणिती ताई यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरद पवार गट, कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर, उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे कार्यकर्ते अशा विविध पक्षाचे कार्यकर्ते व नेते मंडळी शिंदे यांना निवडून आणण्याचे ठरवल्याचे सध्या दिसून येत आहे. पंढरपूर परिसरातील भगीरथ भालके त्याचप्रमाणे अभिजीत आबा पाटील हे नेतेमंडळी प्रणिती ताई शिंदे यांचा प्रचार करताना सद्यस्थितीला दिसून येत आहे. या अशा लोकसभेतील वातावरणामुळेच कदाचित चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील या दोन्ही जागेसाठी भाजपाला निवडून येणे कठीण आहे. असे वक्तव्य केले ते बरोबरच असावे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा