"धर्म बघून मतदान करू नका,कर्म बघून मतदान करा" प्रणिती ताई शिंदे
पंढरपूर ( प्रतिनिधी) धर्म बघून मतदारांनी मतदान करू नका, व्यक्तीचे कर्म बघून मतदान करा. असे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील विविध गाव भेटीच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी आपले मत व्यक्त केले.
अक्कलकोट तालुक्यातील प्रचार सभेमध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे , शरद पवार राष्ट्रवादी गटाचे बंदेनवाज कोरबू काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, निमगावचे माजी सरपंच पठाण, बसवराज नागणसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये पुढे बोलत असताना प्रणिती ताई शिंदे म्हणाल्या भाजपा हा धर्माधर्मामध्ये ,जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारा असा पक्ष आहे. धर्म हा घरातील धार्मिक कर्म उपास तपास, लग्न, पूजापाठ यापुरता मर्यादित असायला हवा. परंतु या धर्माचे राजकारण या विरोधकांनी केलेले आहे. मतदार बंधूंनी धर्म बघून मतदान न करता त्यांनी उमेदवाराची कर्म बघून ,त्याचे कार्य बघून मतदान करावे. असे आवाहन प्रणिती ताई शिंदे यांनी आज मतदारांना केले.
सोलापूर शहर मधून मी तीन वेळा आमदार म्हणून लोकप्रतिनिधी चे कार्य पार पाडले आहे. लोकांच्या कार्याला महत्त्व दिले. तरच लोक आपल्याला मतदान करतात., जवळ करतात मी माझ्या मतदारसंघातील गोरगरीब हिंदू-मुस्लीम शीख ख्रिश्चन सर्व समाजातील लोकांना घेऊन मी त्यांचे कार्य करीत आहे. सोलापुरातील विकास कामांना मी विधानसभेमध्ये आवाज उठवला आहे. आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील असंख्य अडचणी या सद्यस्थितीला आहेत. सोलापूरला भेडसावणारा पाणी प्रश्न आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. या बेरोजगार तरुणांना सोलापूर येथील एमआयडीसीचे विस्तारीकरण करून या एमआयडीसी मधून बेरोजगारांना काम मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सोलापूर शहराची विविध विकास कामे व सुधारणा या करण्यासाठी मला मतदार बंधू भगिनींनी एकदा संसदेत जाण्याची संधी द्यावी. असे आवाहन त्यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील विविध गावामधून त्यांनी आपल्या प्रचार सभे आपले मत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा