"मतदारांनी तीन महिन्यापूर्वीच ठरवलं आहे भाजपाला पराभूत करायचं"..... प्रणिती ताई शिंदे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीच्या आधी तीन महिन्यापूर्वीच त्यांनी ठरवलेलं आहे. भाजपाला पराभूत करायचं म्हणून असे सोलापूर जिल्ह्यातील असंख्य तालुक्यामधून गाव भेटीच्या दरम्यान मध्ये सर्वसामान्य जनता आणि शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांनी आम्हाला हे आवर्जून सांगितलं की आम्ही तीन महिन्यापूर्वीच ठरवलेलं आहे. की या भाजपाला या येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करायचं म्हणून असे वक्तव्य आज पंढरपूर येथे माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आय चे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेमध्ये प्रणिती ताई शिंदे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यापुढे म्हणाल्या भाजपा सरकारने सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना महागाईच्या आणि संकटाच्या दरीमध्ये त्यांनी ढकलून दिलेले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाला आज पर्यंत दहा वर्षांमध्ये दोन लोकप्रतिनिधी भाजपाने दिले. ते काही कामाचे असे नसलेले दोन खासदार आपल्या माथी थोपवले आता तिसरा उपरा म्हणून असलेला हा उमेदवार भाजपाने दिलेला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील असंख्य अडचणी, समस्या सोलापूर जिल्ह्याला असलेला भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न ,बेरोजगारांचे प्रश्न, यंत्र उद्योग  उद्योजकांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न असे असंख्य प्रश्न हे ज्वलंत असताना भाजपाच्या दोन्ही खासदारांनी दहा वर्षांमध्ये संसदेमध्ये आवाज उठवला नाही. असे मुके असणाऱ्या खासदारांना आपण दहा वर्षे निवडून दिले. त्यांनी दहा वर्षे सत्तेची मजा लुटली. आता अशी चूक पुन्हा करू नका. सोलापूर जिल्ह्याला भेडसावणारा पाणी प्रश्न, बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न, सर्वसामान्य महिलांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मला सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून आणि माढा लोकसभा मतदार संघामधून धैर्यशील  मोहिते पाटील यांना आपण निवडून द्यावे. असे आव्हान प्रणिती ताई शिंदे यांनी आज रोजी जाहीर सभेमध्ये केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....