" मोदी यांची लाट थोपवण्यास मशिदी मधील फतव्याचा वापर"..राम सातपुते
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीत रंगत भरू लागलेली आहे. नुकतीच पंढरपूर येथील वाखरी या ठिकाणी भाजपा या पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी आणि त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदार आणि सहयोगी मित्रपक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी व कार्यकर्ते यांची सूक्ष्म नियोजनाची बैठक संपन्न झाली.
भाजपाच्या या सूक्ष्म नियोजनाच्या बैठकीनंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी आपल्या मुलाखतीमधून त्यांनी माहिती देत असता ते म्हणाले सध्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून मोदी हटाव हा एक कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि या विरोधकांनी महाराष्ट्रातील तसेच भारत देशातील मशिदी मधून मोदी सरकार हटवण्यासाठी आता फतवे निघू लागलेले आहेत. त्याचप्रमाणे उर्दू पत्रके ही निघू लागलेली आहेत. याचा जाहीर निषेध राम सातपुते यांनी आज रोजी केला.
सध्या देशभरातील काँग्रेस पक्ष हा आपल्या अस्तित्वासाठी झटत आहे. आणि देशभरात असलेले शांततेचे वातावरण हे बिघडू पाहत आहेत की काय? अशी शंका निर्माण होत आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशभरामधून मशिदी मधून मोदी यांना हटवण्यासाठी फतवे निघू लागलेले आहे. असे खालच्या पातळीचे राजकारण सध्या विरोधक करू लागलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशातील निवडणूक म्हणजे लोकशाहीसाठी उत्सव आहे असे मानले जाते.परंतु या संविधान कार बाबासाहेबांना याच काँग्रेसने 1952 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. बाबासाहेबांचा या काँग्रेसने पराभव करायला लावलेला होता. बाबासाहेबांचे संविधान ही कदापी बदलले जाणार नाही. संविधान बदलले जाणार असे म्हणून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल काँग्रेस पक्ष करत आहे. असे देखील त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा