"बीड च पार्सल एका रात्रीत पाठवू शकतो " धैर्यशील मोहिते पाटील यांची राम सातपुते वर टीका.
पंढरपूर ( प्रतिनिधी) विजय दादांचे ऐकून आम्ही एका रात्रीत त्याला आमदार केलं. आता बीडचा पार्सल एका रात्रीत पाठवू शकतो. असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा मध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या भाषणांमधून त्यांना आपले मत व्यक्त केले.
गेल्या 65 वर्षांमध्ये या तालुक्यामध्ये विकास झाला नाही. मी अडीच वर्षात या तालुक्यामध्ये विकास केला. असे म्हणणाऱ्या आमदाराला आम्ही एका रात्रीत आमदार केलं. तसं हे बीडचं पार्सल एका रात्रीत आम्ही पाठवू शकतो .माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते आता ते सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधील भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर ही टीका करण्यात आली.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करते वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी जमलेल्या तमाम कार्यकर्त्यांना विचारणा करून "हाती तुतारी घ्यायची का"? असे विचारून कार्यकर्त्यांमधून तुतारी हाती घ्या असे म्हणता त्यांनी हाती तुतारी घेऊन माढा लोकसभा मतदार संघाच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी दर्शवली.
माळशिरस तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि जनतेने आम्हा तीन पिढ्यांवर अलोट प्रेम केले आहे. या प्रेमाला आणि प्रतिष्ठेला कुठेही तडा न जाऊ देता आम्ही कार्य करत राहणार. असे त्यांनी यावेळी आपल्या भाषणामध्ये आपले मत व्यक्त केले.
या वेळी उपस्थित मान्यवर जयंत पाटील त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील आणि माळशिरस तालुक्यातील सांगोला तालुक्यातील अशा विविध तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते नेते व जनसमुदाय उपस्थित होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा