"आमदार समाधान आवताडे यांनी भाजपा सरकारने केलेल्या विकास कामाची माहिती गावोगावी जाऊन दिली"
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचारार्थ दौऱ्या च्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी भाजपा सरकारने आजपर्यंत केलेल्या अनेक विकास कामाची माहिती आणि जनतेला मिळालेला लाभ याविषयीची माहिती त्यांनी पंढरपूर तालुक्यातील शिरढोण, कौठाळी, वाखरी, गादेगाव या गावांमधून व वाडीवस्ती वरुन दिली.
यावेळी त्यांच्यासोबत पंढरपूर शहर महिला आघाडीच्या नेत्या डॉक्टर प्राजक्ता देणारे आणि कौठाळी, शिरढोण, वाखरी त्याचप्रमाणे गादेगाव या ठिकाणी असलेले सरपंच ग्रामपंचायत सदस्य व भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार समाधान दादा अवताडे यांनी भाजपा सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनतेला भाजपा सरकारने गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य त्याचप्रमाणे महिलांसाठी उज्वला गॅस योजना अमलात आणून कित्येक ग्रामीण भागातील महिलांचे स्वयंपाकाची सोय त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील असंख्य गावांमधून रस्ते त्याचप्रमाणे जल जीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पिण्याचे पाण्याची सोय ही उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक गावांमधील अंतर्गत रस्ते त्याचप्रमाणे सांस्कृतिक भवन गावांमधील मंदिरे यांच्या विकास कामासाठी त्यांनी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या निधीच्या माध्यमातून असंख्य विकासकामे आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा लोकसभा मतदारसंघातील गावांमधून केल्याची त्यांनी सांगितले.
2024 च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्र सरकारमध्ये मोदी यांना पंतप्रधान करण्याचे आणि देशाला बळकट बलवान करण्याचे पुन्हा एकदा संधी मोदी सरकारला द्यावी. असे त्यांनी आवाहन केले भाजपा पक्षाचे राम सातपुते हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार असून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे समस्त ग्रामस्थांना विनंती केली. विकास कामाचा अखंड झरा हा भाजपा सरकारच आणू शकतो. असे समाधान दादा अवताडे यांनी आज या वरील गावांमधून ग्रामस्थांशी जनसंवाद साधता हे वक्तव्य या वेळी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा