"मेंढापूर या पंढरपुर तालुक्यातील भागांमध्ये ड्रायफूट उद्योगाला पूरक अशी जमीन व महामार्ग आहेत"..... धैर्यशील मोहिते पाटील


 पंढरपूर (   प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील बेरोजगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथा या त्यांनी आपल्या मनोगत मधून मांडल्या मला आज याविषयी बोलावसं वाटतं. पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर या गावा जवळील 700 एकर जमीन शासनाची असून या जमिनीवर पंढरपूर तालुक्यांमध्ये उत्पादित होणारे फळभागामधून द्राक्ष ,चिक्कू, बोर ,सिताफळ, डाळिंब अशा अनेक फळांचे उत्पादन जास्ती प्रमाणात असून या फळांचे ड्रायफूट मध्ये रूपांतरित करण्यासाठी एक मोठा उद्योग समूह निर्माण होऊ शकतो. पंढरपूर तालुक्यातील परंतु आज माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये येणारा हा मेंढापूर या गावी व त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 700 एकर जमीन शासनाची उपलब्ध असून या जमिनीमध्ये ड्रायफूट चे उद्योग व एमआयडीसीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबवले जाऊ शकतात. आणि यासाठी या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेले महामार्ग या परिसरामध्ये उपलब्ध असल्यामुळे या भागांमध्ये एमआयडीसी निर्माण होणे अत्यावश्यक आहे. या भागातून माढा लोकसभा मतदार संघामधून आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मला व प्रणिती ताई शिंदे यांना निवडून दिल्यास संसदेमध्ये या भागातील एमआयडीसी करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासित त्यांनी या भागातील मतदारांना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....