"प्रती राज ठाकरे म्हणून ओळखले जाणारे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे जाहीर सभा"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) गुढीपाडव्याचे महत्त्व साधून 7 एप्रिल रोजी मनसेचे राष्ट्रीय नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला जाहीर पाठिंबा दिला आहे.

    नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या लोक कल्याणकारी कामे आणि राम मंदिर बांधण्याचे दिलेले अभिवचन त्यांनी पूर्ण केले. तसेच 370 कलम, एन आर सी, आणि त्याच प्रमाणे मुस्लिम महिलांच्या बाबतीत अन्यायकारक ठरणारा  तलाक सारख्या अन्यायकारक ठरणाऱ्या या पद्धतीला त्याने अटकाव घातला आहे. 

    मनसेचे नेते राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेले आहेत. त्या अपेक्षा पुढील प्रमाणे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर व्हावे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांचे संवर्धन व्हावे. आणि मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवाव्यात. असे अभिवचन त्यांनी मोदी सरकारकडून घेतलेले आहे. राज ठाकरे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत मोदी यांनी होकार दर्शवलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा  पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. व या महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे त्याने अभिवचन दिलेले आहे. 

   माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मनसेचे कार्यकर्ते, नेते हे भाजपाच्या या उमेदवारांना निवडून देण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहेत. अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पत्रकारांना दिली. 

    यावेळी उपस्थित पंढरपूर मनसेचे शहराध्यक्ष संतोष कवडे त्याचप्रमाणे मनसेचे ज्येष्ठ नेते शशिकांत पाटील आणि मोहम्मद वस्ताद यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    यावेळी मनसेचे दिलीप बापू धोत्रे यांनी या जाहीर सभेस महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. असे त्यांनी सांगितले. तरी या मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेस सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी तरुण तरुणी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज रोजी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....