"मोदींचे पंधरा लाख आम्हाला मिळाले आहेत." लक्ष्मी टाकळी येथील गावकरी
पंढरपूर ( प्रतिनिधी) "मोदी सरकारचे पंधरा लाख रुपये आम्हाला मिळाले आहेत." असे वक्तव्य सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यामधील लक्ष्मी टाकळी या गावी जनसंवाद साधण्यासाठी गेले असता तेथील एका ग्रामस्थांनी सांगितले.
मोदी सरकारने 15 लाख रुपये तुम्हाला देऊ केले का? असा प्रश्न विचारला असता सदरहू गावातील एका व्यक्तीने या प्रश्नाचे छानसे उत्तर आम्हा पत्रकारांना दिले.
मोदी सरकारच्यावतीने 15 लाख रुपये सर्वसामान्य नागरिकांना कशा स्वरूपात मिळाले. त्याचे वर्णन त्या गावकरीने अतिशय छान पद्धतीने केले. मोदी राजवटीमध्ये सर्वसामान्य जनतेला पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा हा दिलेला आहे. मोदी सरकारने पाच वर्ष 80 टक्के जनतेला मोफत राशन अन्नधान्य दिलेले आहे. संपूर्ण देशभरात मोठे महामार्ग बनवलेले आहेत .ग्रामीण भागामधून रस्ते, लाईट आणि पिण्याच्या पाण्याची सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. गोरगरीब जनतेला पंतप्रधान आवास या योजनेतून मोफत घरकुल दिलेले आहे. अशा लाखो रुपयांच्या सुविधा या मोदी सरकारने दिलेल्या आहेत. अशाप्रकारे मोदी सरकारने सर्वसामान्यांना 15 लाख रुपये दिल्यासारखेच आहेत. असे मत लक्ष्मी टाकळी या गावातील अशिक्षित गावकऱ्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आम्ही जमा करू असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन मोदी सरकारने कसे पूर्ण केले. याचे वर्णन या गावकरीने आपल्या गावंढळ भाषेमध्ये व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा