सोलापूर व माढा लोकसभेसाठी "भाजप "ला विजयी करण्यास" मनसे" तयार...
पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा करण्यासाठी भाजपाला संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असते त्यांनी सांगितले होते त्याप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण मतदारसंघांमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना त्यांनी भाजपासाठी व भाजपाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यास मनसेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज रोजी मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयामध्ये बैठक बोलावून घेतली. त्यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदार संघामधील मनसेचे कार्यकर्ते हे भाजपाचे दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहेत असे त्यांनी माहिती दिली यावेळी भाजपाचे सोलापूर विभागाचे चव्हाण व माढा लोकसभा मतदारसंघाचे पदाधिकारी भास्कर कसकवडे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपाला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मनसेचे कार्यकर्ते व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा