"रडीचा डाव न खेळता मैदानात उतरा....मग बघूया कोण किती पाण्यात आहे " धैर्यशील मोहिते पाटील.
पंढरपूर ( प्रतिनिधी) आज रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला हरकत घेण्यात आली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षातील उमेदवारांच्या कडून कोणी कोणाच्या वर हरकती घ्यायचे नाहीत असं ठरलं होतं परंतु एका अज्ञात व्यक्तीला पुढे करून हा हरकतीचा मुद्दा मांडला गेला. हा विरोधकांचा रडीचा डाव आहे. असा रडीचा डाव न खेळता खुल्या मैदानात उतरा पाहूया कोणी किती पाण्यात आहे ते असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाहेर पडताना आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माढा लोकसभा मतदार संघाची ही निवडणूक आता ही कुण्या पुढाऱ्याच्या हातात राहिलेली नाही. ती थेट जनतेच्या हातात गेलेली असून आता जनताच ठरवणार आहे, की कोणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही.
माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये प्रचारासाठी शरद पवार यांच्या प्रचार सभा या 24 तारखेपासून सुरू होणार असून एकूण सहा सभा आपल्या या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज रोजी पत्रकारांना दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा