"४०० रुपये चा गॅस १२०० रुपये झाला.. भाजपा म्हणते मते द्या मला " शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपाचा पराभव करा..... प्रणिती ताई शिंदे
पंढरपूर (प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आय काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल झाल्या नंतर पंढरपूर तालुक्यामधून आपला प्रचार दौरा सुरू केलेला आहे.
पंढरपूर तालुक्यातील फुल चिंचोली, तारापूर,,खरसोळी, पोहरगाव, विटे, आंबे चिंचोली मगरवाडी आधी गावामधून आपला प्रचार दौरा केला. या दौरांच्या दरम्यान त्यांनी सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी भाजपाने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या महागाईचा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर केलेला अन्यायाचा त्यांनी पाढा वाचला.
काँग्रेसच्या राजवटीमध्ये चारशे रुपये ला मिळणारा गॅस या भाजपाच्या राजवटीमध्ये बाराशे रुपये झाला. उज्वला गॅस महिलांना दिल्याचे सांगत फिरणाऱ्या या मोदी सरकारने हा चारशे रुपये गॅस बाराशे रुपये मध्ये खरेदी करायला या उज्वला गॅस धारक महिलांना लावला. असा आरोप देखील त्याने केला.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणार म्हणून आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न, विजेचा प्रश्न सोडवतो असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनापैकी कोणतीही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. गेल्या दहा वर्षांमधील दोन खासदारांनी या भाजपाच्या कारकिर्दीमध्ये कुठलेही जनहिताचे, शेतकऱ्यांच्या कल्याणचे काम केलेले नाही.
विकासाची फसवी गॅरंटी देणारे हे भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी जनतेनी एकजूट होऊन या निवडणुकीत भाजप ला पराभूत करूया.असे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
या गाव भेटीच्या प्रचार दौऱ्यामध्ये उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्यासोबत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील ज्येष्ठ युवा नेते भगीरथ भालके हे देखील सोबत होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त होत असताना ते म्हणाले पंढरपूर मंगळवेढा लोकसभा मतदार संघामधून प्रणिती ताई शिंदे यांना प्रचंड मताधिक्य देण्याचे आम्ही निर्धार केलेला आहे. आमच्यामध्ये स्थानिक पातळीवर जे काही मतभेद होते ते आता राहिलेले नाहीत. तरी आम्ही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्ते व नेते मंडळी ही एकत्र येऊन प्रणिती ताई शिंदे यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी करणार असे त्यांनी आपल्या मनोगतात मधून व्यक्त झाले.
प्रणिती ताई शिंदे यांच्या गावभेट प्रचार दौऱ्यात जनतेनी प्रचंड उत्साहा त्यांचे स्वागत केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा