"प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारासाठी काॅंग्रेसच्या मुलूख मैदान तोफा धडाडणार " सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजीत कदम यांची उपस्थिती.
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज यांच्या मुलख मैदानी तोफा धडाडणार.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील कामती या ठिकाणी दुपारी चार वाजता काँग्रेसचे मान्यवर नेते सतेज पाटील, विश्वजीत कदम, आणि अमित देशमुख या दिग्गजांचा प्रचारार्थ दौरा हा प्रणितीताईंच्या मतदार संघामधून होणार असून प्रणिती ताईंना विजयी करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या ,शेतकरी, कष्टकरी कामगार वंचित घटकांच्या विकासासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रणिती ताई शिंदे यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून द्या .असे आवाहन ते करणार आहे.
कामती येथील सभा आटोपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील महामाया मंदिराजवळ मोठ्या संख्येने सभा होणार असून या सभेमध्ये विश्वजीत कदम, अमित देशमुख आणि सतेज पाटील यांचे मार्गदर्शनपर भाषणे होणार असून या दोन्ही ठिकाणच्या सभेची जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे.
मोहोळ तालुका पंढरपूर, तालुका येथील प्रचार दौरा आटोपून सोलापूर शहरातील लिमये वाडी या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सतेज पाटील, विश्वजीत कदम, आणि अमित देशमुख यांच्या तोफा या धडाडणार आहेत. तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि काँग्रेस प्रेमीजन उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा