जानकरांनी "तुतारी" हाती घेतली तर आमदारकी फिक्स....
पंढरपूर ( प्रतिनिधी) काही दिवसापूर्वीच माळशिरस तालुक्यातील भाजपाचे जेष्ठ नेते उत्तम जाणकारांनी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले होते. की ज्या ज्या वेळी भाजपाचे सरकार शासन दरबारी होते. त्यावेळी माळशिरस तालुक्यातील असंख्य विकासकामे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी या सोडवल्या गेलेल्या नाहीत. विकास कामे केलेली नाही. शासन दरबारी आपली सत्ता असून देखील भाजपा कार्यकर्त्याचे कुठलेच कामे भाजपच्या राजवटीमध्ये होत नसल्याची तक्रार तमाम जनतेच्या वतीने त्यांनी आपल्या मुलाखतीमधून व्यक्त केली होती.
मोहिते पाटील यांच्या भाजपाच्या फारकतीनंतर त्यांनी मोहिते पाटील यांच्या पाठीशी गेले ले चांगले अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्वरित सागर बंगल्यावर बोलवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली ही बाब गुलदस्तातच आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा राजीनामा देऊन तुतारी हे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह हाती घेऊन त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. आणि प्रचार कार्यास त्यांनी सुरुवात केली. माळशिरस तालुक्यातील आमदार राम सातपुते हे आता भाजपाच्या वतीने लोकसभा सोलापूर मतदार संघामधून आपली उमेदवारी घेऊन ते खासदारकीची निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील विधानसभेची जागा ही आता कोणाला मिळणार? माळशिरस तालुका चा पुढील आमदार कोण होणार? अशी चर्चा माळशिरस तालुक्यातून होत असतानाच शरद पवार यांनी उत्तम जानकर यांना आपल्या भेटीस बोलावल्याचे समजते. शरद पवार यांच्या भेटीमध्ये उत्तम जानकर यांनी जर का शरद पवार यांच्याकडे माळशिरस तालुक्याची विधानसभा मागितली. आणि तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणुकीत उभे राहिल्यास मोहिते पाटील त्यांना अवश्य मदत करतील. आणि ते माळशिरस तालुक्याचे आमदार देखील होऊ शकतील. अशी चर्चा माळशिरस तालुका, तसेच सोलापूर जिल्ह्यातील उत्तम जानकर यांचे कार्यकर्ते, व उत्तम जानकर प्रेमी आपले मत व्यक्त करताना सर्वत्र दिसून येत आहेत.
या सर्व राजकीय घडामोडी पाहता उत्तम जानकर यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतल्यास त्यांचे आमदारकी फिक्स झाली म्हणून समजा. अशी चर्चा सध्या माळशिरस मतदारसंघांमध्ये सुरू आहे.
पाहूया उत्तम जानकर हे उत्तम निर्णय घेतात की कसे?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा