"देशातील जनता मोदींच्या पाठीशी आहे.मोदीजींचे कुणीही वाकडं करू शकत नाही ".... देवेंद्र फडणवीस
पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण भारत देशातील जनता नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे कोणीही मोदीजींचं वाकड करू शकत नाही. असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे आपल्या भाषणामध्ये बोलत असताना केले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सोलापूरचे राम सातपुते त्याचप्रमाणे माढाचे उमेदवार म्हणून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा आज रोजी आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला गेला. तदनंतर झालेल्या सभेमध्ये भाजपाचे कार्यकर्ते ,त्याचप्रमाणे लहान मोठे नेते मंडळी या सभेला उपस्थित होते. आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि जनसमुदाय हा उपस्थित होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणामध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले मोदीजींचे कारकिर्दीमध्ये जो गेल्या दहा वर्षांमध्ये विकास झाला आहे. तो काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेला नाही. मोदी सरकारने तळागाळातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी, वंचित, बहुजन सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन तळागाळातील वंचित बहुजन समाजाला आपल्या पायावर उभे राहण्याची ताकद मोदी सरकारने दिलेली आहे. महिलांसाठी विविध योजना मोदी सरकारने राबवलेल्या आहेत. लाकूड फाटा जाळून आपला स्वयंपाक बनवणाऱ्या त्या महिला भगिनींना उज्वला गॅसच्या माध्यमातून त्यांचे आरोग्याची जपूनच केली गेली आहे. अनुसूचित जातीच्या तरुणांना बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले गेले आहे. या अर्थसहाय्यामधून अनुसूचित जाती जमाती मधील तरुणांना उद्योजक बनण्याचे संधी मोदी सरकारने दिलेली आहे.
मोदी सरकार हे पावरफुल इंजिन आहे. या इंजिनला डबे म्हणून एकनाथराव शिंदे, अजित पवार ,रिपब्लिकन पक्षाची आठवले तसेच अन्य पक्षांचे नेते मंडळी ही डब्याच्या स्वरूपात आहे. परंतु दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधी हे स्वतः ला इंजिन म्हणत आहे. शरद पवार हे देखील स्वतःला इंजिन समजतात, मायावती स्वतःला इंजिन समजतात, ममता बॅनर्जी स्वतःला इंजिन समजतात व या इंजिन मध्ये बसायला यांचेच नातीगोती असतात. त्यामुळे सर्वसामान्य बहुजनाला वंचितांना अनुसूचित जाती समाजातील दुर्बल घटकांना यामध्ये बसायला संधी नाही. परंतु मोदी सरकारच्या या डब्यामध्ये सर्व तळागाळातील लोकांना बसण्याची संधी आहे. या तळागाळातील लोकांच्या मुळेच बहुजन समाजामुळे आज मोदी सरकार देशाची प्रगती करत आहे. आणि मोदी सरकारमुळे बहुजनांचा वंचितांचा आज विकास झालेला. आज आपण पाहत आहोत.
सोलापूर तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांना आपले मत देऊन मोदी सरकारचे पुन्हा एकदा सरकार झाले पाहिजे. त्याचप्रमाणे मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हायला पाहिजे. या उद्देशानेच या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना आपले मत द्या. आणि मोदी सरकार पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी त्याचप्रमाणे, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी संधी द्या. असे आवाहन त्यांनी या सभेमधून जनसमुदायाला केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा