"आमदार समाधान आवताडे यांना मंत्री पद मिळावे"........
पंढरपूर प्रतिनिधी...... पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून सलग दुसरे वेळी आपल्या कार्याच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघामधून विजय मिळवत आपण या मतदार संघातील योग्य प्रतिनिधी असल्याचे सिद्ध केले आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये हजारो कोटींचा विकास निधी आणून विकास कामाना गती देण्याचे काम केले आहे.मंगळवेढा तालुक्यातील कित्येक गावाला पिण्याचे पाणी तसेच शेतीला मुबलक पाण्याची सोय म्हणून आवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन, आणि तामदर्डी बंधारा अशा प्रकारे त्यांनी या भागातील पाणीप्रश्न मिटवण्याचे प्रयत्न करुन ते मार्गी लावले आहे. पंढरपूर शहरातील विकास कामे, मराठा भवन आणि मतदार संघात असंख्य ठिकाणी समाज मंदीर, संविधान भवन, व्यायाम शाळा उभारणी, ग्रामीण भागातील रस्ते, आदी असंख्य कामे त्यांनी आपल्या आमदारकीच्या चार वर्षीच्या कारकिर्दीत पूर्ण केली आहेत. एक सुशिक्षित उच्चविद्या धारण करणारे हे युवा नेतृत्व या मतदार संघाला लाभले आहे. आज पर्यंत या मतदार संघाला कोणतेही मोठे पद लाभलेले नाही. आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या अभ्यासूपणाने त्यांनी मह...