पोस्ट्स

" मतदार खूश...उमेदवारांची कसोटी.... चौरंगी लढत अटळ"

 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मंगळवेढा मतदारसंघातील विविध पक्षीय उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.     एकूण अठरा जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.    भाजपाचे उमेदवार समाधान दादा अवताडे तसेच काॅंग्रस आय चे भगिरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे अशी चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे.      पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील या विधानसभेच्या निवडणूकीची आतूरतेने सर्वसामान्य जनता वाट पहात आहे.पाच वर्षातून एकदा येणारी ही निवडणूक मतदारांच्या साठी सर्वं बाबतीत आनंदोत्सव साजरा करण्यासारखी असते.कोण किती मते घेणार? कोण कुठे कमी पडणार? कोण कोण सुक्या ओल्या पंगती उठवणार? मतागणिक अर्थ कारणांची चर्चा होत रहाणार.     संविधानाने सर्वसामान्य जनतेला मतदानाचा अधिकार दिला आहे.परंतू ग्रामीण भाग सोडल्यास शहरी भागातून मतदान कमी प्रमाणात होत असते.सर्व सुविधा शहरी भागात प्रथम हो...

" विरोधकांना टीका करु द्या आपण विकास कामे करु".... आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) विरोधकांना टीका करु द्या आपण विकास कामे करु असे प्रतिउत्तर आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील माचणूर या गावी  श्री सिद्धेश्वर मंदिर येथे आपल्या प्रचाराचा नारळ फोडून आपल्या प्रचार सभेच्या प्रारंभ सुरू केला.    या प्रचार सभेस उपस्थित प्रशांत परिचारक व अन्य असंख्य मान्यवर नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.    या वेळी आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मला या मतदारसंघात फक्त अडीच वर्षे काम करण्यासाठी मिळाले.या अपुऱ्या कालावधीमध्ये मी तीन हजार कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.या निधी मधून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध गावांमधील रस्ते समाज मंदिरे , संविधान भवन,मराठा भवन,तामदर्डी बंधारा, मंगळवेढा पाणी उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी मंजूर करून आणला, मतदारसंघातील विविध तीर्थ क्षेत्र विकास कामे, तसेच अनेक मंदीरांचा जिर्णोद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.अशी अनेक कामे मला मिळालेल्या कार्यकालात मी पूर्ण केली आहेत.मला पाच वर्षांचा कालावधी मिळाला तर मी आणि प्रशांत परिचारक आम्ही दो...

"यशवंत माने पुन्हा एकदा बाजी मारणार? "

 पंढरपूर ( प्रतिनिधी) मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा राखीव असल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत दिसून येत आहे.     रमेश कदम यांच्या पाणीदार पणामुळे ते चर्चित राहिले.त्यांच्यावरील आरोपांमुळे ते या मतदारसंघांतून गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसले नाही.परंतू या निवडणुकीत त्यांच्या कन्या सिध्दी कदम यांना‌ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या पक्षाचे ए.बी.फाॅर्म दिले गेले पुन्हा ते रद्द करण्यात आले.या गोंधळामुळे रमेश कदम गट नाराज झालेले आहे.तो काय निर्णय घेतात हे पहावे लागेल.     गेली कित्येक महिने राजू खरे हे या मोहोळ मतदारसंघात सक्रिय झाल्याचे दिसून येते.त्यांनी लोकवर्गणीतून जेवढे जास्त विकास कामे करता येतील तेवढे कामे करून ते या मतदारसंघात उमेदवार म्हणून उभे राहू इच्छित आहे.     वरील परिस्थिती सद्या या मतदारसंघात दिसून येत आहे.यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत.राष्ट्रवादी काॅंग्रस मध्ये फूट पडल्याने ते अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी लागते आहे.मोहोळ तालुक्याचे सर्वेसर्वा राजन पाटील यांचे या मतदा...

"विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने माझ्या प्रचार सभेत तेअडथळा आणतं आहेत." मनसे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये माझ्या गाव भेटीच्या माध्यमातून मला मिळणारा प्रतिसाद तसेच बेरोजगार युवक तरुण आणि महिला वर्गांच्या मधून मला मिळणारा वाढता प्रतिसाद मतदारसंघातील विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. असे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील वाखरी या गावी प्रचार सभेमध्ये बोलत असताना ते म्हणाले.      महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज साहेब ठाकरे यांच्या ध्येय धोरणावर तसेच विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहे. या पक्षाच्या माध्यमातून आम्ही असंख्य कामे केलेली आहेत. पंढरपूर शहर असो पंढरपूर तालुका असो किंवा मंगळवेढा तालुका असो या सर्व मतदारसंघांमध्ये आम्ही गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीला धावून गेलो आहोत. कित्येक गरजूंना मदत केली आहे. सर्वसामान्य जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आशेने पाहत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये प्रचार दौरा मध्ये फिरत असताना प्रत्येक गावांमधून वाड्यावस्ती मधून आम्हाला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. त्यामुळेच माझ्या प्रचार सभेमध्ये अडथळा आणण्याच्या उद्...

"मी केलेल्या कामामुळे मतदार मला पुन्हा निवडून देतील " .... आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मी केलेल्या विकास कामामुळे मला पुन्हा एकदा मतदार निवडून देतील अशी मला खात्री आहे. असे मनोगत आमदार समाधान आवताडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.     आज भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या दुसऱ्या यादीमध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून घोषित झालेले समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील उमेदवारी जाहीर करून त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कार्याला कामाला एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम भारतीय जनता पार्टीने त्यांना या ठिकाणातील उमेदवारी देऊन केलेली आहे.       आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले मला मिळालेला आमदारकीचा मोजका कालावधी, या कालावधीमध्ये मी अनेक विकास कामे या मतदारसंघांमध्ये आणलेले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावाचा पाणी प्रश्न असो, तामदर्डी बंधाऱ्याचे काम असो, पंढरपूर शहरातील बेरोजगारांना हाताला काम मिळावे म्हणून एमआयडीसी मंजूर करण्यासाठी केलेले प्रयत्न असो, असे असंख्य विकासकामे मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक...

" समाधान आवताडे यांच्या कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांचे जल्लोषात केले स्वागत "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांना पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी भाजपा पक्षाने जाहीर केली.      भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पंढरपूर येथे समाधान आवताडे व परिचारक यांच्यामध्ये समेट घडवण्याच्या उद्देशाने आलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत पंढरपूर शहरांमध्ये समाधान दादा अवताडे यांच्या कार्यालया समोर समाधाना अवताडे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.     समाधान दादा अवताडे यांना पुन्हा एकदा भाजपाची उमेदवारी मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करीत होते. समाधान आवताडे हे आपल्या कार्याचे जोरावर पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून विजयी होणार. समाधान आवताडे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी देऊन आपला आनंद व्यक्त केला.

"दि पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ बॅंकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा " ....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने पंढरपूर येथील व्यापाऱ्यांची बॅंक म्हणून ओळखली जाणारी आणि सर्व सुविधा व तत्पर सेवा ग्राहकांना देणारी सहकार क्षेत्रातील अग्रेसर बॅंक म्हणून ओळखली जाणारी दि.पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ.बॅंक पंढरपूर या बॅंकेला मोबाईल बॅंकींगची सेवा ग्राहकांना देण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे.      सोलापूर जिल्ह्यातील दि.पंढरपूर मर्चंट काॅ.र्ऑफ.बॅंक पंढरपूर ही ग्राहकांना मोबाईल सेवा देणारी पहिली बॅंक म्हणून मान मिळाला आहे.ग्राहकांना तत्पर सेवा देणारी,व हीत जपणारी बॅंक म्हणून ओळख असलेल्या या बॅंकेतील सर्व संचालक व कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद ‌कार्यामुळे ही सेवा ग्राहकांना देण्याचा बहुमान मिळाला आहे.     दि.पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ.बॅंक पंढरपूर चे व्यवस्थापक, शाखा प्रमुख, सर्व कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.