पोस्ट्स

"महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कमिशन एजंट आणि व्यापारी बांधवानी शेतकऱ्यांना मदत करावी."

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.ज्या जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जायचे अशा जिल्ह्यामधून आज पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतामधील उभे पीक पाण्यामध्ये वाहून गेले आहे. सर्व जिल्ह्यांमधून त्या भागामधील राजकीय नेते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते हे पूर बाधित लोकांच्या गावांमध्ये जाऊन त्यांना सहकार्य करीत आहे मदत करीत आहे. शासनाने 2000 कोटीच्या पुढील रकमेची मदत जाहीर केलेली आहे ठिकठिकाणी पिकांची नुकसानीचे पंचनामा केले जात आहे. शेतकरी कर्ज काढून आपल्या शेतामध्ये पीक लावतो. या पिकांना लागणारा खते औषधे बियाण्यांचा खर्च हे सर्व पाहता हे सर्व कर्ज काढूनच त्याला करावे लागते त्यात आसमानी संकटाने कहर केल्यामुळे करायला आत्महत्या करण्या शिवाय पर्याय राहिला नाही. अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिसून येत आहे.       ज्या शेतकऱ्यांच्या पिकावर तसेच भाजीपाल्यावर फळफळावर आधी शेतीमालावर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील एजंट तसेच व्यापारी या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव ठरवून कमिशनच्या माध्यमातून असंख्य रुपये कमावतात या एजंटाचे त...

"सोलापूर जिल्ह्यातील पुढाऱ्यानो शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला कधी धाऊन येणार".....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे .दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा आणि सोलापूर जिल्हा या भागामधून देखील प्रचंड पावसाने थैमान घालून सर्वसामान्यांचे तसेच शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या शेतामधील व पीक या पावसाने मातीमोल केले. शेतामधील माती वाहून गेली, जनावरे वाहून गेली ,शेळी बकरे, शेतामधील धान्य ,पीके,घरे वस्त्या हे सर्व काही वाहून गेले .अगोदरच कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेला हा शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा एकदा कर्जाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेला आहे. अशा या अन्नदात्याला या अस्मानी संकटातून वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना किती मदत करणार आहे ॽनुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2000 ते अडीच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केले आहे. ही मदत अतिशय तुटपुंजी असून शेतकऱ्याची गरज या निधीमधून भागणार नाही. महाराष्ट्र सरकार कुंभमेळ्यासाठी 24 हजार कोटी रुपये चा निधी राखीव म्हणून ठेवू शकतात. परंतु संपूर्ण जगाचा अन्नदाता शेतकरी संकटात असताना त्याला नाम मात...

"एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहिला नाही पाहिजे "....... आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) मंगळवेढा तालुक्यातील लोणार,हुन्नूर,मारोळी,शिरनांदगी,चिकलगी,निंबोणी,खवे आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत निसर्गाच्या अवकृपेमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवत दिलासा देऊन सरकारच्या माध्यमातून  सर्वोतोपरी मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले.एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहिला नाही पाहिजे अशी काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असे आमदार समाधान दादा अवताडे यांनी सुचना केली.        मुसळधार पाऊस होत आहे तरी शेतकऱ्यांनी शेतातील धोकादायक इमारती मध्ये वास्तव्य करुन नये.सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.असे आवाहन केले.मंगळवेढा तालुक्यातील लोणार या गावातील पांढरा कांदा प्रसिद्ध आहे.या कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आमदार समाधान दादा अवताडे यांनी केली.     यावेळी आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत उपस्थित असलेले मंगळवेढा तालुक्यातील तहसीलदार मदन जाधव कृषी अधिकारी मिसाळ मॅडम म्हैसाळ योजनेचे डेप्युटी इंजिनिअर गोसावी शाखा अभियंता श्री शिंदे भीमा पाटबंधारे विभागाचे इंजिनिअर जाधव शाखा अभि...

" स्वेरी काॕलेजने समाजासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करुन एक आदर्श निर्माण केला "

इमेज
 ‌पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर या ठिकाणी असलेले कॉलेज ऑफ इंजिन इंजिनिअरिंग गोपाळपूर यांच्यावतीने अभियंता दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.       या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 272 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणारे कॉलेजमधील विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुंबईच्या दास ऑफ शोअर लिमिटेडचे लिमिटेडचे सह संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.अशोक खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ बीपी रोंगे संस्थेची सचिव डॉ. सुरज रोंगे माजी अध्यक्ष माजी अध्यक्ष व विश्वस्त एन एस कागदे,माजी अध्यक्ष व विश्वस्त दादासाहेब रोंगे विश्वस्त बी डी रोंगे स्वेरी च्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर ,उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके इतर विश्वस्त कॅम्पसच्या डॉ.एम.एम पवार उप प्राचार्य डॉक्...

" अमरजित पाटील पंढरपूर मर्चंट को.ऑप.बॅंकेचे चेअरमनपदी निवड" व्हाइस चेअरमनपदी विजयकुमार परदेशी यांची निवड.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मर्चंट को.ऑप.बॅंकेचे संस्थापक मंडळातील माजी आमदार कै.औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू व कै.राजाराम औदुंबर पाटील यांचे चिरंजीव अमरजित पाटील यांची आज रोजी 2025/26 या वर्षाकरीता पंढरपूर मर्चंट को.ऑप.बॅंक पंढरपूर या बॅंकेच्या चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच बॅंकेच्या व्हाईस चेअरमन पदी विजयकुमार परदेशी यांची निवड करण्यात आली.या निवडीच्या कार्यक्रम प्रसंगी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी सहाय्यक निबंधक योगिता मुरडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.     चेअरमन पदी निवड झाल्यानंतर नूतन चेअरमन अमरजित पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त होत असता ते त्यांनी बॅंकेचे सर्व संचालक मंडळ,बॅंकेचे सभासद,खातेदार,ठेवीदार व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले.बॅंकेचे सर्व संचालक मंडळ, खातेदार, ठेवीदार सभासद यांच्या विश्वासाला पात्र राहून बॅंकेच्या प्रगती साठी प्रयत्न केले जाईल.असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.     यावेळी बॅंकेचे सर्व संचालक मंडळातील गत वर्षातील चेअरमन शितल तंबोली,व्हाइस चेअरमन शिखरे माजी चेअरमन नागेश काका भोसले,माजी चेअरमन...

" लाडक्या बहिणी आणि रोंगे सरांच्या लाडक्या विद्यार्थीनी साठी नऊ मजली वस्तीगृह उभारून मुलींची राहण्याची सुविधा"...... पालकमंत्री जयकुमार गोरे

इमेज
 पंढरपूर.( प्रतिनिधी) ग्रामीण भागातील बहुजन समाजामधील भावी पिढीला शैक्षणिकदृष्ट्या प्रगत करण्याच्या उद्देशाने रोंगे सर यांनी गोपाळपूर सारख्या माळरानावर तंत्र शिक्षणाची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बहुजन समाजामधील असंख्य मुलांमध्ये या ठिकाणी उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहे.       मुलींचे पालक हे आपल्या मुलीला उच्च शिक्षणाची संधी व सुविधा उपलब्ध या ठिकाणी झाल्यामुळे कित्येक पालक हे आपल्या मुलीला उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने या स्वेरी या शिक्षण संकुलामध्ये दाखल करीत आहेत. या ठिकाणी डॉ. बीपी रोंगे सर यांनी मुलींच्या साठी नऊ मजली इमारत उभारून मुलींच्या राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे .त्यामुळे पालक कुठलीही चिंता न करता या ठिकाणी आपल्या मुलीला वस्तीगृह मध्ये ठेवत आहेत. मुलींची राहण्याची सोय झाल्यामुळे या ठिकाणी पाचशे ते सहाशे विद्यार्थिनींची राहण्याची, जेवणाची तसेच चहापाण्याची आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेली हे वसतिगृह डॉ. बीपी रोंगे सर यांनी चालू केल्यामुळे अनेक पालकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे. असे मनोगत अध्यक्ष स्थानावरून सोलापूर जिल्ह्याच...

"मनाच्या अस्वस्थते मधूनच नावीन्यपूर्ण उद्दिष्ट साकारले जात असते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. बी.पी रोंगे सर"...... उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) डॉ. बीपी रोंगे सर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने आपले उच्च शिक्षण मुंबई या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सोलापूर येथील वालचंद इंजीनियरिंग कॉलेज या ठिकाणी नोकरी करत असतानाच त्यांचे मन सर्वसामान्यांच्या मुला मुलींसाठी काहीतरी तंत्रशिक्षणामध्ये भव्य दिव्य उच्च शिक्षणाची संशोधनाची सोय व्हावी या उद्देशाने त्यांचे मन अस्वस्थ व्हायचे या मनाच्या अस्वस्थते ते मधूनच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वेरी या उच्च तंत्रज्ञान शिक्षण संकुलामध्ये उच्च शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत या शैक्षणिक संकुलामध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग फार्मसी एमबीए तसेच लॉ कॉलेज अशा अनेक व्यावसायिक शिक्षणाला चालना देण्याचे काम या शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजामधील असंख्य मुलं मुली हे विविध कंपन्या मधून कामाला लागतील आणि पुढील पिढीला एक आदर्श निर्माण करून देतील या उद्देशाने डॉक्टर बीपी रोंगे सरांनी हे ज्ञानदानाचे मंदिर उभा केले आहे. असे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज रोजी स्वेरी या महाविद्यालयामध्ये मुलींच्या साठी ९...