" प्रभागात प्रसंग असेल बाका तर बोलवा नागेश काका"
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये सध्या पंढरपूर शहरांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असून शहरात थंडीचा जोर वाढत असतानाच निवडणूक आणि प्रचारामुळे संपूर्ण शहरात गरम वातावरण पंढरपूर निवासी अनुभवू लागले आहेत. पंढरपूर शहरातील उपनगर म्हणून ओळखले जाणारे लिंक रोड नागालँड परिसर या प्रभाग क्रमांक 13 मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार नागेश काका भोसले यांच्यासोबत तीर्थक्षेत्र विकासासाठीच्या महिला उमेदवार रुक्मिणी धनाजी धोत्रे या महिला उमेदवार या प्रभागामध्ये निवडणुकीस उभे असून या प्रभागांमध्ये गत पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागेश काका हे या प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते . या प्रभागामध्ये त्यांनी त्यावेळी निवडणूक लढवण्या पूर्वीच या भागामध्ये नागेश काका भोसले यांनी रस्ते व त्याचप्रमाणे या प्रभागामधील मूलभूत सुख सुविधा नागेश काकांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु काही कारणास्तव त्यांनी उमेदवारी मागे घेऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सौ साधनाताई नागेश भोसले यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी या ठिक...